बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)
विसाव शतक हे हिंसाचार, युध्द आणि रक्तरंजित राज्यक्रांत्या यांच शतक. सगळी युध्द संपवणार एक अखेरच युध्द अशी भाबड्यांची कल्पना झाली होती दुसऱ्या महायुध्दाबद्दल. अणुबॉंबच्या हाहाकाराने १९४५ साली माणूस मुळापासून हादरला होता. परंतु थोडाच काळ. पुन्हा तो सावरला. आणि हायड्रोजन बॉंब, क्षेपणास्त्रे, जैवीक आणि रासायनिक अस्त्र यांची निर्मिती, राष्ट्रवादाने पछाडल्यामुळे, करू लागला. "नो मोर हिरोशिमाज" ही हाक त्यात विरून गेली. माणसाच्या या विकृत मारणध्यासाची शोधकहाणी म्हणजेच हे पुस्तक बाराला दहा कमी. साध्या टी. एन. टी आणि नायट्रोग्लिसरीन अशा स्फोटकांपासून अणूबॉंबपर्यंत माणसाचा स्वत:लाच नष्ट करणाऱ्या अस्त्रांचा शोध मानवाने कसा लावला याचे विहंगम आणि प्रदीर्घ विवेचन पद्मजा बाईंनी या पुस्तकात केले आहे. एकीकडे जागतिक शांततेचा उदघोष करीत आणि दुसरीकडे स्वत:च एकापेक्षा एक भयानक अस्त्र निर्मिती करण्याची दुटप्पी भूमिका जागतीक महासत्तांनी घेतलेली दिसते. म्हणजे मुहमे राम और बगल मे छुरी असे म्हणतात ना त्याप्रमाणे. आजकाल अमेरीकेबरोबर अणुकरार करायची भारताची लगबग सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर...