Posts

Showing posts from April, 2015

Book Review : द व्हॅली ऑफ फिअर मुळ लेखक - ऑर्थर कॉनन डायल अनुवाद - प्रवीण जोशी (दर्जा ****)

Image
"बर्‍याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!" - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अक्राळविक्राळ दरी... 'द व्हॅली ऑफ फिअर".... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी. सर आर्थर कॉनन डॉयल यांचा मानसपुत्र शेरलॉक होम्स याच्या थरारक कारनाम्याची ही एक कादंबरी. ती इंग्रजीत खूप गाजली. तिचा हा मराठी अनुवाद. शेरलॉकच्या कादंबऱ्या ज्यांना वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. त्याविषयी वेगळे काही सांगायची गरज नाही. या पुस्तकाला अनुवादकाने छोटेसे टिपण जोडले आहे. त्याला 'प्रस्तावना' असे नाव दिले असले तरी तो 'ऋणनिर्देश' आहे. प्रस्तावना म्हणण्याजोगे त्यात काहीही नाही. शिवाय अनुवादकाचा 'ऋणनिर्देश' हाही अशा प्रकारच्या पुस्तकासाठी उचित नाही. याशिवाय इन्प्रिंटच्याच पानावर अनुवादकाची अर्पणपत्रिकाही दिली आहे. तिचीही गरज नव्हती. अनुवाद मात्र चांगला उतरला आहे. गेल्या पाच, सहा पिढ्यांना