Posts

Showing posts with the label Book Introduction

Short Books Recommendations

Image
Bibliophiles have always been a boastful bunch. They go on endlessly about how many books they have, how many hardcovers, and also, all of their custom bookmarks! So, if you have a similar person in your group, ask them to finish these books in a day. ‘Animal Farm’ by George Orwell A relatively small book of about 100-120 pages, ‘Animal Farm’ paints a dystopian world where animals overthrow their oppressive farmers and take over the farm. But soon, they too become corrupt like the humans they defeated. ‘Convenience Store Woman’ by Sayaka Murata Another short novel that can be completed in a single sitting is this one. The book is the story of Keiko Furukura, a woman who finds peace and calm in her convenience store job and has no will or expectations to climb the ‘social ladder’. 'Poonachi' by Perumal Murugan 'Poonachi' is a powerful novel by the acclaimed Perumal Murugan and is the story of a frail black goat in rural India. The book uses anthropomorphism and gives the...

पुस्तक परिचय - व्यंकटेश माडगूळकर - नागझिरा

Image
आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... जंगल - काय असतं ? म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल! आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या.  आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्प...

पुस्तक परिचय - सुनंदा अमरापुरकर - खुलभर दुधाची कहाणी

Image
नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या.  असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फ...

पुस्तक परिचय - संजय सोनवणी - तृतीय नेत्र

Image
विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!           भन्नाट कादंबरी वाचायला हाती घेतली आणि वाचतच राहिलो. खिळवून ठेवणं काय असतं याचा प्रत...

पुस्तक परिचय - एस एल भैरप्पा - आवरण आणि सार्थ

Image
छद्मी धर्मनिरपेक्षता आणि ती जोपासणारी कडवी जातीयवादी इकोसिस्टीम समजून येईल या दोन पुस्तकांमधून...... आवरण आणि सार्थ पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्यांनी एकहाती पुरोगाम्यांच्या आव्हानाला साहित्यात उत्तर दिले...आणि ज्यांचे साहित्य समाजाने उचलून धरले ...असे प्रसिद्ध कन्नड लेखक एस_एल_भैरप्पा यांची ही दोन प्रसिद्ध पुस्तकं.  भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले हल्ले, झालेले हल्ले, इतिहासातील हल्ले आणि पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी! लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते.....रक्षाबंधन भेट म्हणून एक चांगली निवड! भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांचे लक्तर या कादंबरीतून भैरप्पा ने वेशीवर टांगून ठेवले आहेत...जे पुरोगामी विचारांचा भुरका तोंडावर घेऊन बसले.. त्यांचा तो भुरका भैरप्पांनी टराटरा फाडला आहे! आवरण गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ एस एल भैरप्पा! आजवर त्यांनी 21कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. त...