Posts

Showing posts from December, 2005

भारत विकणे आहे – वि. स. वाळींबे (मु.ले. चित्रा सुब्रमण्यम) दर्जा (***)

Image
विकासाचा मार्ग अनुसरताना भारताला कोणता त्रास सोसावा लागला, यापेक्षा विकास करून घ्यायला नकार दिल्यामुळे या देशाला कोणत्या अनावश्यक यातना सहन कराव्या लागल्या, याचा ‘भारत विकणे आहे’ या पुस्तकात वस्तुस्थितीच्या आधारे मार्मिक उहापोह करण्यात आला आहे. आपल्याला जेव्हा अभिमान वाटायला हवा तेव्हा आपण शरमून जातो, आणि जेव्हा आपली आपल्यालाच लाज वाटायला हवी तेव्हा आपण स्वतःवर खूष होऊन जातो. हे असे का घडते, याचे परखड विवेचन म्हणजे चित्रा सुब्रम्हण्यम यांचा हा महत्त्वपूर्ण लेखसंग्रह. वर्तमानाकडे पाठ फिरवून आपण एकतर वेदांचा आधार शोधू लागतो किंवा भविष्यकाळासंबंधी जागतिक बॅंकेकडे आशाळभूतपणे पाहू लागतो. हा लेखसंग्रह म्हणजे गेल्या पंन्नास वर्षातील आपल्या बालिश वर्तनाचा सडेतोड आलेखच. आपण, आपल्या सभोवतालचे वास्तव आणि इतर वास्तवांच्या संदर्भात या वास्तवाचे मूल्यमापन या संबंधात अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य हा लेखसंग्रह समर्थपणे पार पाडतो. आपल्या पुढा-यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विदूषकांसारखे वर्तन करून, स्वतःचे आणि देशाचे कसे आणि किती हसे करून घेतले, हे जाणून घेण्यासाठी ‘भारत विकणे आहे’ वाचायलाच हवे

मी आतापर्यंत वाचलेली पुस्तक

Image
मी आजतागायत वाचलेल्या काही पुस्तकांची यादी मी खाली देत आहे. ही यादी परीपुर्ण नसून मला आठवेल त्या प्रमाणे मी ही यादी बनविलेली आहे. यादीची रचना खालील प्रमाणे आहे. पुस्तकाचे नाव - लेखक - प्रकार - दर्जा १. चंद्रावरचा खून - द. पा. खांबेटे - विज्ञानकथा - ***** २. हेरॉईनचे सौदागर - विजय देवधर - रहस्यकथा - **** ३. दुसरे महायुध्द - वि. स. वाळींबे - इतिहास - ***** ४. वॉर्सॉ ते हिरोशिमा - वि. स. वाळींबे - इतिहास - ***** ५. पॅपिलॉन - रविंद्र गुर्जर - अनुवादीत रहस्यकथा - ***** ६. बॅंको (पॅपिलॉन भाग २) - रविंद्र गुर्जर - अनुवादीत रहस्यकथा - ***** ७. मुसोलीनी - मदन पाटील - चरित्र - *** ८. काश्मिर एक ज्वालामुखी - सेतू माधवराव पगडी - राजकीय - **** ९. अँग्री हील्स - रवींद्र गुर्जर, चंद्रशेखर बेहेरे (मुळ लेखक - लिऑन उरीस) - अनुवादीत रहस्यकथा - *** १०. माओचे लश्करी आव्हान - दि. वी. गोखले - राजकीय - **** ११. दि किलर्स - मदन पाटील - अनुवादीत रहस्यकथा - *** १२. वॉलॉंग एका युध्दकैद्याची डायरी - कर्नल श्याम चव्हाण - युध्द इतिहास - **** १३. सुर्यकोटी समप्रभ - माधव साखरदांडे - विज्ञान - **** १४. कृष्णमेघ -

पहिले पान

Image
मला अगदी लहानपणापासून पुस्तके वाचण्याचा छंद होता. माझी वाचनाची सुरुवात प्रथम वर्तमानपत्रांपासुन झाली. वडील रोज वर्तमानपत्र आणित, ते शक्या तेवढे वाचण्याचा मी प्रयत्न करीत असे. मी वर्तमान पत्रातला अग्रलेख वाचावा असा मला वडील आग्रह करीत. अग्रलेख नेहेमी माहितीपुर्ण असतात असे त्यांचे मत होते. त्याच काळात मला वर्तमानपत्रातील कात्रणे जमा करण्याचाही छंद जडला. वर्तमानपत्रात प्रकाशित होणारे विविध देशांचे नकाशे आणि केबीके या इन्फोग्राफीक संस्थेने प्रकाशित केलेले वेवेगळ्या विषयांवरचे आलेख संग्रहीत करणे हा माझा प्रमुख छंद होता. ती कात्रणवही अजुनही माझ्याकडे आहे. इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला इंग्रजी हा विषय सुरु झाला. मला इंग्रजी शिकणे सोपे जावे या उद्देशाने माझ्या मोठ्या भावाने, उमेशने मला अनेक कॉमिक पुस्तके आणुन दिली. या कॉमिक्सनी माझ्या कोवळ्यामनावर चांगले संस्कार घडविण्याचे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला वाचनाची आवड लावण्याचे अमुल्य कार्य केले. त्यासाठी मी माझा मोठा भाऊ ऊमेश याचा सदैव ॠणी राहील. लहानपणी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्