निरंजन घाटे - स्वप्नचौर्य ★★★★
आधुनिक मराठी विज्ञान कथांचे भीष्म पितामह कोण असे कोणी विचारले तर निरंजन घाटे यांचे चित्र समोर उभे राहते. मी कॉलेजला असल्यापासून त्यांच्या विविध विज्ञान कथांचा आणि विज्ञान लेखनाचा आस्वाद घेतला आहे. त्यांचे कथा लेखन ओघवते आणि चातुर्यपूर्ण असते. स्वप्नचौर्य हा एक कथासंग्रह माझ्या वाचनात आला. विज्ञानकथांचे पितामह या नात्याने त्यांच्याकडून अपेक्षा फार असतात, पण प्रत्येक वेळी हे रसायन जुळून येईलच असे काही नाही. अगदी पहिल्या 'पराभूत' या कथेने माझी निराशा केली. घाटे सर नेहमी त्यांच्या कथा एका अंधारात सुरू करतात. निम्मी कथा वाचेपर्यन्त कशाचा पायपोस कशाला लागत नाही. आणि कथेच्या अगदी शेवटी त्या कथेतील विज्ञानाचा उलगडा करतात. या कथेचे असेच झाले आहे. अगदी निम्याहून अधिक कथा संपेपर्यंत काय चालले आहे ते समजत नाही. कुठले पात्र कोणाचे काय लागते हे न समजल्यामुळे बराच गोंधळ उडतो. घाटे सरांनी कथा सुरुवात करताना, कथेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे वाचकांच्या दृष्टीने सोईचे ठरेल असे वाटते. अयोनिज या कथेत मानवी क्लोनिंगची कल्पना सुचवून शेवटी अचानक त्याचा ज्योतिष शास्त्राशी संबंध लावून थोडी निराशा केल...