बोरिबंदर ते प्रार्थना समाज

"मेट्रो" चौकात कोपऱ्यावरच असलेले "कयानी" हे "इराणी हॉटेल" तिथे मिळणाऱ्या "ब्रून मस्का आणि सामोसे या साठी प्रसिद्ध आहेच पण इथे मिळणारा "इराणी स्पेशल" चहा जिभेवर खूपवेळ चव ठेऊन जातो. त्या हॉटेल च्या बरोबर समोरच्या वाडीत धोबी तलाव लेन मध्ये असलेली ख्रिश्चन वस्ती पण लक्ष वेधून घेते. आणि पुढची "हमाल वाडी" म्हणजे इथली 100 टक्के मराठी वस्ती. या परिसरात मला आठवते त्या नुसार 3 इराणी कॅफे होती. इराणी हॉटेल म्हणजे आताच्या "कॅफे कॉफी डे" सारखी म्हणजे 1 कॉफी घ्या आणि कितीही वेळ बसा. थोडं पुढे आल की "प्रिन्सेस स्ट्रीट" चा चौक लागतो. असे म्हणतात की इथे "इंग्लंड ची प्रिन्सेस" रहायची म्हणून हे नाव पडले. ते खरेही असेल कारण मी मुंबईत आलो त्या वेळी बघितले होते की या चौका पासून म्हणजे आताचा (jss road) "जगन्नाथ शंकर रोड" पाण्याने धुवून काढत असत. इथेच कोपऱ्यावर असलेल्या "आल्फ्रेड बिल्डिंग" मध्ये "पारशी डेअरी" होती. तिथे मिळणारे दुधाचे उत्तम प्रकार आणि केक खाल्ले नाहीत असा या परिसरात कोणीही नस...