वी दी नेशन (वाया गेलेली वर्षे) – वि. स. वाळींबे (मु. ले. नानी पालखीवाला) दर्जा (****)
नानी पालखीवाला हे विसाव्या शतकातले भारतातले एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. पेशाने वकील असलेले ही व्यक्ती, भारतीय कायदा आणि घटना यांमध्ये तज्ञ समजली जाते. वकीली व्यतिरीक्त विविध महाविद्यालयांतून त्यांनी अध्यापनाचे कामही केले. टाटा समुहासह काही नामांकीत कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काही काळ ते अमेरीकेतील भारताचे राजदूतही होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. भारतीय कायदा आणि घटना यांचा त्यांना नितांत आदर होता आणि भ्रष्टाचाराविषयी विलक्षण चीड होती. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना भारतीय लोकशाही आणखी मजबूत व्हावी, समाजातल्या सर्व थरातील लोकांनी आपले परस्पर भेदभाव विसरून, एक भारतीय म्हणून गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती. वी दी नेशन हे पुस्तक म्हणजे त्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेल्या विविध भाषणांचे आणि व्याख्यानांचे संकलन आहे. या सर्व भाषणातून त्यांनी भारतीय कायदा, घटना, अर्थव्यवस्था, लोकशाही, समाजवाद यांवर योग्य टिकाटीप्पणी केली आहे. काही ठीकाणी त्यांचे म्हणणे अतिशयोक्तिपुर्ण वाटते पण पुर्णपणे ...