जगाची मुशाफिरी - निरंजन घाटे दर्जा (****)
आज मी जगाची मुशाफिरी हे निरंजन घाटे यांनी लिहीलेले पुस्तक वाचून संपवीले. निरंजन घाटे हे एक उत्कृष्ट विज्ञानकथा लेखक असून काही वेळा इतर किरकोळ लेखनही करतात. त्यांची लेखनशैली सुबोध असून ओघवती आहे, त्यामुळेच ते माझे आवडते लेखक आहेत. हे पुस्तक प्रवासवर्णन असल्याप्रमाणे वाटते परंतू लेखकाने कुठेही प्रत्यक्ष प्रवास केल्याचे म्हटलेले नाही. त्यात जागाच्या कानाकोपऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचे यापुस्तकात वर्णन असल्यामुळे त्यासर्व जागी प्रवास करणे लेखकाला अशक्य असल्याचे वाटते. पुस्तकात एकूण ८८ पृष्ठे होती. ५ सप्टेंबर २००५ ला हे पुस्तक मी वाचावयास सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर २००५ ला संपविले. नुकतेच सभासदत्व पत्करलेल्या सदाशिव पेठेतल्या मराठी साहित्य परीषदेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मी मिळवले होते. हे पुस्तक आणि आणखिन एक पुस्तक अनिल काळे यांनी अनुवादीत केलेले ट्रीनिटिज चाईल्ड मी साहित्य परीषदेतून सभासद झाल्यानंतर प्रथमच घेतले. वेळ न पुरल्यामुळे ट्रीनिटिज चाईल्ड हे पुस्तक पुर्ण वाचू शकलो नाही. पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे हे एक भूगोलतज्ञ असून पुण्यातच रहातात. विज्ञानविषयक दृष्टीकोन आणि ज्ञान या...