Posts

Showing posts with the label Bhagwat Geeta

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 23

Image
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः । धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥ शब्दार्थ योत्स्यमानान् - लढणार्‍यांना अवेक्षे - मला पाहू दे अहम् - मी ये - जे एते - ते अत्र - येथे समागता: - एकत्रित झालेल्या धार्तराष्ट्रस्य - धृतराष्ट्राच्या पुत्रांचे दुर्बुद्धे: - वाईट बुद्धीचा युद्धे - युद्धात प्रिय - प्रिय चिकीर्षव: - इच्छिणारे अर्थ धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खूष करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. तात्पर्य दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती, पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की, त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे. त्यांच्या बळाचा अं...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 21

Image
अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत । यावदेतान्निरिक्षेऽहं योद्‌धुकामानवस्थितान् ॥२१॥ कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्रणसमुद्यमे ॥२२॥ शब्दार्थ अजुर्न:उवाच - अर्जुन म्हणाला सेनयो: - सैन्यांच्या उभयो: - दोन्ही मध्ये - मध्यभागी रथम् - रथ स्थापय - कृपया उभा कर मे - माझा अच्युत - हे अच्युत! (कधीच पतन न होणार) यावत् - जोपर्यंत एतान् - हे सर्व निरीक्षे - पाहू शकेन अहम् - मी;  योद्धा-कामान् - युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या अवस्थितान् - युद्धभूमीवर रचिलेल्या कै: - कोणाबरोबर मया - मला सह - बरोबर योद्धव्यम् - युद्ध करावयाचे आहे अस्मिन् - या रण - संघर्ष, युद्ध समुद्यमे - प्रयत्नात, खटपटीत अर्थ अर्जुन म्हणाला: हे अच्युत! कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या  आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्रस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रे...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 20

Image
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः । हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ॥२०॥ शब्दार्थ अथ - त्यानंतर व्यवस्थितान् - स्थित दृष्ट्वा - पाहून धार्तराष्ट्रान् - धृतराष्ट्रपुत्र कपि-ध्वज: - ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे प्रवृत्ते - युद्ध आरंभ होण्यापूर्वी शस्त्र-सम्पाते - बाण चालविण्यापूर्वी धनु: - धनुष्य उद्यम्य - उचलून पाण्डव: - पांडुपुत्र हृषीकेशम् - भगवान श्रीकृष्णांना तदा - त्या वेळी वाक्यम् - शब्द इदम् - हे आह - म्हणाला मही-पते - हे राजन् अर्थ हनुमानाचे चिह्न असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्या वेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन्! व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला. तात्पर्य युद्धाला आरंभ होण्यास कालावधी होता. वरील कथनावरुन समजून यते की, युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 19

Image
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् । नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन् ॥१९॥ शब्द स: - तो घोष: - ध्वनी धार्तराष्ट्राणाम् - धृतराष्ट्राच्या पुत्रांची हृदयानि - हृदये व्यदारयत् - विदीर्ण केली नभ: - आकाशाला च - सुद्धा पृथिवीम् - पृथ्वीतल च - सुद्धा एव - निश्चितच तुमुल: - निनाद अभ्यनुनादयन् - दुमदुमून गेला अर्थ हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला, तेव्हा पांडवांची हृदये मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही; परंतु या विशिष्ट श्‍लोकामध्ये पांडवपक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्‍वास होय. जो भगवंतांचा आश्रय घेतो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 16, 17, 18

Image
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः । नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥१६॥ काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥१७॥ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ॥१८॥ शब्दार्थ अनन्त-विजयम् - अनन्तविजय नामक शंख राजा - राजा कुन्ती-पुत्र: - कौतेय युधिष्ठिर: - युधिष्ठिर नकुल: - नकुल सहदेव: - सहदेव च - आणि सुघोष-मणिपुष्पकौ - सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख काश्य: - काशीचा राजा च - आणि परम-इषु-आस: - श्रेष्ठ धनुर्धारी शिखण्डी - शिखंडी च - सुद्धा महा-रथ: - सहस्र सैनिकांशी एकटाच लढू शकणारा धृष्टद्युम्न: - धृष्टद्युम्न (राजा द्रुपदाचा पुत्र) विराट: - विराट (या राजाने पांडवांना अज्ञातवासच्या वेळी आश्रय दिला होता) च - सुद्धा सात्यकि: - सात्यकी (म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा सारथी युयुधान) च - आणि अपराजित: - ज्याच्यावर कोणीच विजय प्राप्त करू शकला नाही द्रुपद: - पांचालदेशाचा राजा, द्रुपद द्रौपदेया: - द्रौपदीचे पुत्र च - सुद्धा सर्वश:- सर्वजण पृथिवी-पते - हे राजन् सौभद्र: - सुभद्रापुत्र अभिमन्यू च - सुद्धा महा-बाहु: - वि...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 15

Image
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः । पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥१५॥ शब्दार्थ पाञ्चजन्यम् - पाञ्चजन्य नावाचा शंख हृषीक-ईश: - हृषीकेश (श्रीकृष्ण, जे भक्तांच्या इंद्रियांना मार्गदर्शन करतात) देवदत्तम् - देवदत्त नावाचा शंख धनम्-जय: - धनंजय (धनावर विजय प्राप्त करणारा अर्जुन) पौण्ड्रम् - पौण्ड्र नावाचा शंख दध्मौ - वाजविला महा-शङ्खम् - भीषण शंख भीम-कर्मा - अतिदुष्कर कर्म करणारा वृक-उदर: - बेसुमार भक्षण करणारा भीम अर्थ भगवान श्रीकृष्णांनी आपला पाञ्चजन्य नावाचा शंख वाजविला; अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौण्ड्र नामक शंख वाजविला. तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्‍लोकामध्ये हृषीकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरुपे आहेत. निर्विशेषवादी, जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवं...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 14

Image
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥१४॥ शब्दार्थ तत:- त्यानंतर श्वेतै:- श्‍वेत किंवा शुभ हयै:-घोड्यांनी युक्ते-युक्त अशा महति-एका महान स्यन्दने-रथात स्थितौ-स्थित माधव:-श्रीकृष्ण (लक्ष्मीपती) पाण्डव:- पांडुपुत्र अर्जुन च-सुद्धा एव- निश्चितच दिव्यौ-दिव्य शङ्खौ-शंख प्रदध्मतु:- वाजविले अर्थ दुसऱ्या बाजूला, शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख  वाजविले. तात्पर्य भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की, पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची अशा नव्हती. जयस्तु पाण्डुपुत्राणां येषां पक्षे जनार्दन:- पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात, त्या ठिकाणी लक्ष्मीदेवीसुद्धा असते. कारण लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहता नाही. ...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 13

Image
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः । सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥ शब्दार्थ तत: - त्यानंतर शङ्खा:- शंख च-सुद्धा भेर्य:-मोठे नगारे, भेरी च-आणि पणव-आनक-लहान ढोल आणि तुताऱ्या गो-मुखा:- रणशिंग सहसा-अचानकपणे एव-खचितच अभ्यहन्यन्त-एकाच वेळी वाजू लागली स:- तो शब्द:- (एकत्रित झालेला) आवाज तुमुल:- भयंकर अभवत्-झाला अर्थ त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 12

Image
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥१२॥ शब्दार्थ तस्य - त्याचा सञ्जनयन् - वाढवीत हर्षम् - हर्ष, आनंद कुरु-वृद्ध:- कुरुवंशातील वयोवृद्ध (भीष्म) पितामह:- पितामह सिंह-नादम्-सिंहगर्जनेप्रमाणे विनद्य-निनाद करीत उच्चै:-उच्च स्वरात शङ्खम्-शंख दध्मौ- वाजविला प्रताप-वान्-पराक्रमी अर्थ नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने, सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंत:करणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरुपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की, त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वत: परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 11

Image
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥ शब्दार्थ   अयनेषु - व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी च - सुद्धा सर्वेषु - सर्व ठिकाणी यथा-भागम् - निरनिराळ्या नेमलेल्या जागी अवस्थिता: - स्थित असलेले भीष्मम् - पितामह भीष्मांना एव - निश्चित अभिरक्षन्तु - सर्व प्रकारे साहाय्य करा भवन्त: - तुम्ही सर्वे - सर्वांनी एव हि - निश्चितच अर्थ   आता तुम्ही सर्वांनी सैन्यव्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण साह्य केले पाहिजे. तात्पर्य भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की, इतर योद्धांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरुन वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने ठामपणे सांगितले की, भीष्मदेव हे नि:संशय  सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्याकारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने  विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणून इतर योद्ध...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 10

Image
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥१०॥ शब्दार्थ अपर्याप्तम् - अपरिमित तत् - ते अस्माकम् - आमचे बलम् - शक्ती, बल भीष्म - पितामह भीष्माद्वांरे अभिरक्षितम् - पूर्णपणे सुरक्षित पर्याप्तम् - सीमित, परिमित तु - परंतु इदम् - हे सर्व एतेषाम् - पांडवांचे बलम् - शक्ती, बल भीम - भीमाने अभिरक्षितम् - काळजीपूर्वक रक्षण केलेले अर्थ आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत; परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वांत अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलटपक्षी, कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडवसैन्य हे सीमित आहे. भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे. कारण तो पूर्णपणे जाणून होता की, जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल. पण त्याचबरोबर अत्यंत...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 9

Image
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः । नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥ शब्दार्थ अन्ये - इतर सर्व च - सुद्धा बहव: - मोठ्या संख्येने शूरा: - शूरवीर मत्-अर्थे - माझ्यासाठी त्यक्त-जीविता: - प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत नाना - अनेक शस्त्र - शस्त्रे प्रहरणा: - युक्त, सुसज्जित सर्वे - ते सर्व युद्ध-विशारदा: - युद्धकलेत निपुण असलेले. अर्थ माझ्यासाठी स्वत:च्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. तात्पर्य जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्धांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 8

Image
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः । अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥८॥ शब्दार्थ भवान् - आपण स्वत: भीष्म: - पितामह भीष्म च - आणि कर्ण: - कर्ण च - आणि कृप: - कृपाचार्य च - तथा समितिञ्जय: - नेहमी युद्धविजयी अश्वत्थामा - अश्वत्थामा विकर्ण: - विकर्ण च - तथा सौमदत्ति: - सोमदत्ताचा पुत्र तथा - सुद्धा एव - नक्कीच च - सुद्धा. अर्थ येथे आपण स्वत:, भीष्म, कर्ण, कृप, अश्व त्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्धांचा उल्लेख केला आहे. कारण, हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्व त्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलीकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण, पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पेटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 7

Image
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥ शब्दार्थ अस्माकम् - आपले तु - परंतु विशिष्टा: - विशेष बलशाली ये - जे तान् - त्यांना निबोध - नीट जाणून घ्या द्विज-उत्तम - हे ब्राह्मणश्रेष्ठा नायका: - नायक, सेनापती मम - माझ्या सैन्यस्य - सैन्याचे संज्ञा-अर्थम् - जाणून घेण्यासाठी तान् - त्यांना ब्रवीमि - मी सांगतो ते - तुम्हाला अर्थ हे ब्राह्मणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरिता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 6

Image
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् । सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥ शब्दार्थ युधामन्यु: - युधामन्यू च - आणि विक्रान्त: - पराक्रमी उत्तमौजा: - उत्तमौजा च - आणि वीर्य-वान् - अत्यंत शक्तिशाली सौभद्र: - सुभद्रेचा पुत्र द्रौपदेया: - द्रौपदीपुत्र च - आणि सर्वे - सर्व एव - निश्चितपणे महा-रथा: - महारथी अर्थ तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 5

Image
धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान् । पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥५॥ शब्दार्थ धृष्टकेतु: - धृष्टकेतू चेकितान: - चेकितान काशिराज: - काशिराज च - सुद्धा वीर्य-वान् - अत्यंत बलशाली पुरुजित् - पुरुजित कुन्तिभोज: - कुंतिभोज च - आणि शैब्य: - शैब्य च - आणि नर-पुङ्गव: - मानव-समाजातील श्रेष्ठ वीर अर्थ तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 4

Image
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥ शब्दार्थ अत्र - येथे शूरा: - शूरवीर महा-इषु-आसा: - महान धनुर्धर भीम-अर्जुन - भीम आणि अर्जुन समा: - बरोबरीचे युधि - युद्धामध्ये युयुधान: - युयुधान विराट: - विराट च - सुद्धा द्रुपद: - द्रुपद च - सुद्धा महा-रथ: - महान योद्धा अर्थ येथे (या सैन्यामध्ये) भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत. तात्पर्य द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो. कारण, त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपुर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली.

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 3

Image
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥ शब्दार्थ पश्य - पहा एताम् - ही पाण्डु-पुत्राणाम् - पांडूच्या पुत्रांची आचार्य - हे आचार्य महतीम् - विशाल चमूम् - सैन्यदल व्यूढाम् - व्यूहरचना द्रुपद-पुत्रेण - द्रुपद पुत्राने तव - तुमचा शिष्येण - शिष्य धीमता - अत्यंत बुद्धिमान. अर्थ हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य, द्रुपदपुत्र, याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य तात्पर्य : मुत्सद्दी दुर्योधनाला, आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य, यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वत:कडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही. आता ...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 2

Image
सञ्जय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥ शब्दार्थ सञ्जय: उवाच - संजय म्हणाला द्दष्ट्वा - पाहून तु - पण पाण्डव-अनीकम् - पांडवांचे सैन्य व्यूढम् - व्यूहरचना दुर्योधन - राजा दुर्योधन तदा - त्या वेळी आचार्यम् - शिक्षक, गुरु उपसङ्गम्य - जवळ जाऊन राजा - राजा वचनम् - शब्द अब्रवीत - म्हणाला. अर्थ संजय म्हणाला : हे राजन्! पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य धृतराष्ट्र हा जन्मत:च आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की, आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण, उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि...

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 1

Image
धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१॥ शब्दार्थ धृतराष्ट्र:उवाच - राजा धृतराष्ट्र म्हणाला धर्म-क्षेत्रे - धर्मक्षेत्रावर कुरु-क्षेत्रे - कुरुक्षेत्र नावाचा भूमीवर समवेता - एकत्रित आलेल्या युयुत्सव: - युद्धाची इच्छा करणऱ्या मामका:- माझा पक्ष (पुत्रांनी) पाण्डवा - पांडुपुत्र च - आणि एव - निश्चितपणे किम् - काय अकुर्वत - त्यांनी केले सञ्जय - हे संजया अर्थ धृतराष्ट्र म्हणाला: हे संजया! कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य ताप्तर्य: भगवद्गीता, हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता -माहात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की, मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि याप्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्णभक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे ...