Book Review : अल कायदाचे धागेदोरे मुळ लेखक - इम्तियाज गुल अनुवाद - रेखा देशपांडे (दर्जा **)
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhwe5T4hi-9xhNtqzmskqPaHWajNyno8wAk6S1ExGlXzIumeSHZvf4EVQD73edYQ4KeUXGzoN_n2OWc0AROqSNmT04ASOw6DRKxXdP7b7yyzTdf7cxsuTMgF5mNppDlqKoRez3wImnYh8E/s200/Al+Kayadache+Dhagedore.jpg)
पाकिस्तानमध्ये लष्कर-राजकारणी आणि दहशतवादी संघटनांच्या घुसळणीतून काय घडत आहे, हे जाणून घेणे भारतासाठी अत्यावश्यक ठरते. मात्र इस्लाम, त्यांचा अर्थ लावणारे घटक, त्यांच्या परस्परांत टकरा, आंतरराष्ट्रीय पवित्र्यांचे परिणाम अशा प्रवाहांचीही नीट माहिती आपल्याकडे करून घेतली जात नाही. मुख्य धाराच नीट माहीत नाहीत, मग बारीकसारीक तपशील कोण पाहणार? मात्र पाकव्याप्त काश्मीरचा अफगाण सीमाप्रदेश, त्याचे सात विभाग, तिथला भूगोल, टोळ्या, आर्थिक-भौतिक मागासलेपण-त्यातून पाय रोवण्यास दहशतवाद्यांना अनुकूल भूमी याची विलक्षण तपशिलात जाऊन माहिती पाकिस्तानी पत्रकार इम्तियाज गुल यांनी गोळा केली. स्वत:चा जीव अनेकदा धोक्यात घालून पायी हिंडणे, भेटीगाठी, एखादा धागा पकडून त्या संघटनेच्या नेत्याला भेटणे, मिळालेली माहिती विवेकाने तपासणे, त्याआधारे आणखी तपशील असा हा विस्मयकारी प्रवास आहे. त्याचेच प्रत्यंतर रेखा देशपांडे अनुवादित ‘अल कायदाचे धागेदोरे’ हे पुस्तक वाचताना येतो. अल कायदा, तालिबान वहाबी इस्लाम, दहशतवाद, आयएसआय... आदी शब्दमालिका भारतात उच्चारली म्हणजे, अशिक्षित सामान्य जनांपासून वर्तमानपत्रांचे...