Book Review : पुन्हा नव्याने सुरूवात लेखक - अभिषेक ठमके (दर्जा ***)
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi3RFHz7pE8FcOS5sFE2SIV3jOntC7jZ3PQ13GB-siPxChWOT32GvyCPVa7yj-UQBH20ASeM5w-uEZUoKd3zRK7sW6UJSBKVMcJmbcRzJl6Fn8mqcROtPza5FdmKFSH2ZiTm73ceiFKtm0/s200/Punha+Navyane+Suruwat.jpg)
या कादंबरीतून महासागरांचा इतिहास, जमिनीखाली आणि समुद्रामध्ये कशा प्रकारे संशोधन होते, संशोधकांचे जीवन कसे असते, सैनिक म्हणजे नक्की काय असतो, निसर्गाची उत्पत्ती कशी झाली आणि अशा प्रकारची बरीच माहिती मिळवता येईल. हे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे. लेखकाला लहानपणापासून संशोधक होण्याची इच्छा, म्हणून भरपूर पुस्तके वाचून काढली. अनेक संशोधकांचे चरित्र वाचले. सर्वकाही सुरळीत चालू होते आणि त्यातच मिलिटरी स्कूलमध्ये शेवटच्या वर्षी लेखकाचा अपघात झाला. नंतर रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला आणि लेखकाची बरीच स्वप्ने धुसर झाली. जास्त धावू नये, जास्त वजन उचलू नये अशी अनेक बंधने लेखकावर आली. संशोधनात काही करता आले नाही याचा खूप त्रास होत होता. संशोधनातून काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आणि जगाला काहीतरी नवीन दाखवायचं ही खंत काही केल्या मनातून जात नव...