Book Review : श्रीमानयोगी लेखक रणजीत देसाई (दर्जा *****)
या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६८ च्या सुमारास प्रसिद्ध झाली. अगदी शाळेत असल्यापासून ग्रंथालयात या पुस्तकाचे दर्शन घडायचे. पण त्याचे जाडजुड स्वरुप पाहता वाचायची हिम्मत झाली नाही. आता जेव्हा वाचन हा माझा नियमीत छंद झाला आहे, तेव्हा हे पुस्तक वाचण्याची संधी मी घेतली. मराठी कादंबरी लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कलाकृतीकडे पाहिले जाते ते योग्यच असल्याचा अनुभव मला ही कादंबरी वाचताना आला. रणजीत देसाईंनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत हे शिवचरीत्र मांडले आहे. कादंबरीचा शेवटचा १०% भाग वगळता कुठेही रटाळपणा आलेला नाही. हे चरित्र ६०% काल्पनीक तर ४०% सत्य या स्वरुपात मांडले आहे. त्यामुळे महाराजांच्या इतिहाची माहिती आणि कादंबरीचा रसास्वाद या दोन्ही गोष्टी साध्य होतात. तत्कालिन महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. महाराष्ट्रात बहामनी सुलतानांचे राज्य होते. वरकरणी सहिष्णू वाटणारे हे सत्ताधिश हिंदू जनतेवर अनन्वीत अत्याचार करीत होते. संपूर्ण महाराष्ट्राचे इस्लामीकरण हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता. दुर्दैवाने त्याला आपले हिंदु सरदारही त्यांना साथ देत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ...