Book Review : अस्मानी लेखक शुभदा गोगटे (दर्जा *****)
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEierzdC-9GjiYM5huoAEqLz8mK2mDIRmBHBCMaSFBJ2UXuezNvdLyjlDVw7veVDEBou0FK2gzRchPeDxmAzdD2V7Ojxketuz7R7aQj5I-fK5MLXlb-4Oku7hVkdwr5kBhXvp0rzOkx8Xqg/w148-h200/Shubhada+Gogate+-+Asmani.jpg)
अस्मानी म्हणजे वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झालेल्या विज्ञानकथांचा एक उत्कृष्ट संग्रह आहे. विज्ञानकथा हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे यांची कथांची निवड चांगली आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या विज्ञान कथांमुळे एकसुरीपणा टाळला गेला आहे. विज्ञानकथा लिहताना अतिकल्पनाविलास केलेला नाही. विज्ञानकथा शास्त्रशुध्द विचारांवर आधारित असल्याने वाचनीय झाल्या आहेत. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. गवत खाऊन काम करणार्या यंत्रम...