Book Review : द व्हॅली ऑफ फिअर मुळ लेखक - ऑर्थर कॉनन डायल अनुवाद - प्रवीण जोशी (दर्जा ****)

"बर्‍याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!" - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अक्राळविक्राळ दरी... 'द व्हॅली ऑफ फिअर".... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.

सर आर्थर कॉनन डॉयल यांचा मानसपुत्र शेरलॉक होम्स याच्या थरारक कारनाम्याची ही एक कादंबरी. ती इंग्रजीत खूप गाजली. तिचा हा मराठी अनुवाद. शेरलॉकच्या कादंबऱ्या ज्यांना वाचायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. त्याविषयी वेगळे काही सांगायची गरज नाही. या पुस्तकाला अनुवादकाने छोटेसे टिपण जोडले आहे. त्याला 'प्रस्तावना' असे नाव दिले असले तरी तो 'ऋणनिर्देश' आहे. प्रस्तावना म्हणण्याजोगे त्यात काहीही नाही. शिवाय अनुवादकाचा 'ऋणनिर्देश' हाही अशा प्रकारच्या पुस्तकासाठी उचित नाही. याशिवाय इन्प्रिंटच्याच पानावर अनुवादकाची अर्पणपत्रिकाही दिली आहे. तिचीही गरज नव्हती. अनुवाद मात्र चांगला उतरला आहे.

गेल्या पाच, सहा पिढ्यांना बुद्धीमान शेरलॉक होम्सच्या गाजलेल्या कादंबरीचा प्रवीण जोशी यांनी केलेला हा अनुवाद आहे. एखादे काल्पनिक पात्र आपल्याच जगातील वाटावे, एवढे जीवंत करण्याचे श्रेय त्याचा जनक सर आर्थर कॉनन डायलकडे जातं. डोक्यावर हॅट, ओठांमध्ये चिरूट, हातात काठी अशा वेशभूषेतील शेरलॉक होम्स "बऱ्याचदा सत्य कल्पनेपेक्षा थरारक असतं" असं सांगतो. अमेरिका आणि युरोपशी संबंधित या कथेत शेरलॉक होम्स त्याच्या तीक्ष्ण बुद्धीच्या साह्याने अत्यंत अवघड कोडे सोडवितो. भयाच्या, भीतीच्या या दरीत खोल बुडी मारून सत्य शोधून काढण्याच्या त्याच्या रोमांचकारी वाचकही सामील होतात.

शेरलॉक होम्स हे सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या कादंबरीतील पात्र, त्यांचा मानसपुत्र. पेशाने डिटेक्टिव्ह असलेल्या शेरलॉक होम्सच्या कादंबऱ्यांनी वाचकांना खिळवून ठेवले. बर्लस्टन राजवाड्यात
झालेल्या डग्लसच्या खुनाचा तपास होम्स ज्या पद्धतीने लावतो, ते अगदी वाचताना मती गुंग होते. अगदी होम्समधील विविध गुणांची चुणूक दिसते. डिटेक्टिव्ह, हेरगिरीच्या कथा ज्यांना आवडतात, त्यांना ही कादंबरी खिळवून ठेवते.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा