Posts

Showing posts from February, 2017

Book Review : उत्तम अनुवाद दिवाळी २०१६ (पद्मगंधा प्रकाशन) (दर्जा **)

Image
अनुवादीत साहित्याचा मी फार पुर्वीपासून भोक्ता आहे. जगातल्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. परंतु अनुवादाचा दर्जा जर चांगला नसेल तर मात्र निराशा पदरी पडते. उत्तम अनुवाद हा दिवाळी अंक वाचताना नेमके हेच झाले. उत्तम अनुवाद हे नाव वाचताना वाचकांच्या अपेक्षा उंचावतात. यात नक्कीच दर्जेदार साहित्याचा दर्जेदार अनुवाद वाचायला मिळेल असे वाटते. परंतु या वार्षिकाने मात्र वाचकांची घोर निराशा केली आहे. प्रकाशकाने लेखांची निवड व्यवस्थित केलेली दिसत नाही. मुळ लेखनच फारसे चांगले नसल्याने अनुवादही फरसा वाचनीय झाला नाही. त्यात अनुवाद कर्त्यांचा दर्जाही सूमार दिसून येतो. त्यामुळे साहित्याची पुरती वाट लागलेली दिसते. कुठल्या अंगाने याला उत्तम अनुवाद म्हणावे हा प्रश्न पडतो. पुर्ण पुस्तकात मला फक्त "स्टीफन - राशोलचा कवी" हा एकमेव लेख आवडला. १५०० साली पोर्तुगिजांनी गोवा बळकावल्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या सक्तीच्या धर्मांतराची माहिती यात मिळते. गोवा आणि सालसेत भागातल्या सारस्वत ब्राह्मणांना त्याकाळी धर्म वाचवण्यासाठी घरदार सोडून परागंदा व्हावे ल...