Book Review - अरविन्द वैद्य - प्रज्ञावंत 1 भारतीय
* जगन्नाथ तथा नाना शंकरशेट * दादाभाई नौरोजी
* बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय
* बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा
* रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके
* इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
* कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा
* डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा
* डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण
* डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल
* एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी
* खान अब्दुलगफ्फार खान
या पुस्तकात भारतीय प्रज्ञावंतांचा संक्षिप्त जीवनालेख आहे. लेखकाने अत्यंत सोप्या भाषेत त्यांचे चरित्र मांडले आहे. यातील बऱ्याच लोकांचे चरित्र आपण शालेय पुस्तकांत वाचलेच आहे तर काहीजण आपल्याला अल्प अथवा अपरिचित आहेत. या पुस्तकांच्या निमित्ताने आपल्याला त्यांची ओळख होते. पुस्तक वाचल्यावर आपल्याला ते काहीसे नेहरुवादी असलेले दिसतात. जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताची भक्कम पायाभरणी केली हे निश्चितच आहे, परंतु त्यांनी केलेल्या गंभीर चुका आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जाणवतात. एकंदरीत या प्रज्ञावंतांची मूलभूत तोंडओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Comments
Post a Comment