माझ्या ब्लॉगचे स्थलांतर

२००५ पासून मी ब्लॉगिंग करत आहे. फावल्या वेळेत "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" या उक्तीप्रमाणे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा थोडेफार लिहीण्याचा मी प्रयत्न करतो. वेगवेगळे विषय हाताळण्याचा मी प्रयत्न करतो. गूगलने उपलब्ध करून दिलेला ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म या कामासाठी खूप उपयोगी पडला. विनामुल्य लेखन करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त होती. २००५ च्या आसपास ब्लॉगींगची चलती होती. अनेक प्रतिभावंत लेखक ब्लॉग लिहीत होते. २०१५ नंतर हळूहळू टिकटोक नावाचे शॉर्ट विडियोचे माध्यम प्रसिद्ध झाले. त्याने जगाला अक्षरश: वेड लावले. तोपर्यंत केवळ मित्रांना आपसात संवादाचे साधन असलेल्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम यांनीही त्यात उडी घेतली. त्याचबरोबर यूट्यूबवर व्हिडिओ ब्लॉग बनवणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. लेखन वाचण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यम लोकांना जास्त पसंत पडले. या काळात बऱ्याच लेखकांनी ब्लॉग लिहिणे सोडून या दृकश्राव्य माध्यमांचा आसरा घेतला. एकेकाळी प्रचुर लेखन होत असलेले ब्लॉग ओस पडले. मी मात्र इतकी वर्षे इमानेइतबारे ब्लॉग लेखन करत आहे. ब्लॉग लेखनाची लाट ओसरल्यामुळे गुगलचेही या माध्यमाकडे दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याच ...