माझ्या ब्लॉगचे स्थलांतर

Maharaja
२००५ पासून मी ब्लॉगिंग करत आहे. फावल्या वेळेत "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" या उक्तीप्रमाणे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा थोडेफार लिहीण्याचा मी प्रयत्न करतो. वेगवेगळे विषय हाताळण्याचा मी प्रयत्न करतो. गूगलने उपलब्ध करून दिलेला ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म या कामासाठी खूप उपयोगी पडला. विनामुल्य लेखन करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त होती. २००५ च्या आसपास ब्लॉगींगची चलती होती. अनेक प्रतिभावंत लेखक ब्लॉग लिहीत होते. २०१५ नंतर हळूहळू टिकटोक नावाचे शॉर्ट विडियोचे माध्यम प्रसिद्ध झाले. त्याने जगाला अक्षरश: वेड लावले. तोपर्यंत केवळ मित्रांना आपसात संवादाचे साधन असलेल्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम यांनीही त्यात उडी घेतली. त्याचबरोबर यूट्यूबवर व्हिडिओ ब्लॉग बनवणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. लेखन वाचण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यम लोकांना जास्त पसंत पडले. या काळात बऱ्याच लेखकांनी ब्लॉग लिहिणे सोडून या दृकश्राव्य माध्यमांचा आसरा घेतला. एकेकाळी प्रचुर लेखन होत असलेले ब्लॉग ओस पडले.

मी मात्र इतकी वर्षे इमानेइतबारे ब्लॉग लेखन करत आहे. ब्लॉग लेखनाची लाट ओसरल्यामुळे गुगलचेही या माध्यमाकडे दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याच काळपासून त्यांनी त्यांच्या ब्लॉगर या संकेतस्थळाचे डेवलपमेंट थांबवली आहे. त्यामुळे त्यात नावीन्य आणणे आणि अधिक आकर्षक ब्लॉग बनवणे अशक्य झाले आहे. जुन्या थीमस्  नवीन काळातल्या इंटेरनेटशी सुसंगत नाहीत आणि त्यात बऱ्याच त्रुटी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता मी स्वत:ची ब्लॉग वेबसाइट बनवण्याचा निर्णय घेतला. एचटीएमएल आणि सीएसएस मला थोडेफार ज्ञान आहे. त्यामुळे ड्रीमविवर या माझ्या आवडत्या वेब डीजायनिंग सॉफ्टवेअरचा वापर करून एक वेबसाइट बनवायला घेतली. वेबहोस्टिंग साठी बाईटहॉस्ट या मोफत वेबसाइट आणि डोमेननेम हॉस्ट निवडला. हळूहळू प्रयोग करत एक ब्लॉग वेबसाइट बनवली आहे. ब्लॉगरवरचे सर्व ब्लॉग हळूहळू त्या वेबसाइटला स्थलांतरीत करत आहे.

यापुढे माझ्या या ब्लॉगवर मी काही पोस्टिंग करणार नाही आहे. त्यामुळे माझ्या ब्लॉगचे यापुढे वाचन करण्यासाठी http://ppshenoy.byethost12.com/index.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. ब्लॉग वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नये. ब्लॉग आवडल्यास माझ्या ब्लॉगची लिंक आपल्या ब्लॉगवर अथवा वेबसाइटवर नक्की टाका. धन्यवाद. 

Comments

Popular posts from this blog

Book Review : कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा