Posts

Showing posts from 2024

Short Books Recommendations

Image
Bibliophiles have always been a boastful bunch. They go on endlessly about how many books they have, how many hardcovers, and also, all of their custom bookmarks! So, if you have a similar person in your group, ask them to finish these books in a day. ‘Animal Farm’ by George Orwell A relatively small book of about 100-120 pages, ‘Animal Farm’ paints a dystopian world where animals overthrow their oppressive farmers and take over the farm. But soon, they too become corrupt like the humans they defeated. ‘Convenience Store Woman’ by Sayaka Murata Another short novel that can be completed in a single sitting is this one. The book is the story of Keiko Furukura, a woman who finds peace and calm in her convenience store job and has no will or expectations to climb the ‘social ladder’. 'Poonachi' by Perumal Murugan 'Poonachi' is a powerful novel by the acclaimed Perumal Murugan and is the story of a frail black goat in rural India. The book uses anthropomorphism and gives the...

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Image
Why Bharat Matters is a book written by Indian politician and author S. Jaishankar , and published by Rupa Publications. Jaishankar was the incumbent Minister of External Affairs of the Government of India. In this book, Jaishankar discusses India's foreign policy and emphasises the importance of Bharat, i.e. India, with its ever-growing role on the global stage as a potential superpower. Why Bharat Matters is Jaishankar's second book, followed by his previous book The India Way: Strategies for an Uncertain World, in which he provided his analysis of India's geopolitical strategy since independence, along with India's historical statecraft and the impact of colonisation. In Why Bharat Matters, Jaishankar delves deeper into India's foreign policy landscape, emphasising the country's cultural values and global ambitions. He explores the significance of India's historical heritage, particularly drawing insights from the epic Ramayana. It discusses India's e...

सुहास शिरवाळकर - समांतर - दर्जा ★★★★★

Image
शिरवळकरांनी १९७४ साली रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' या साहित्यप्रकाराकडे वळले. 'लोकांना आवडेल ते' अशा मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, शिरवळकरांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी लघुकथाही लिहिल्या. या कथांचे पुढे कथासंग्रह झाले. त्यांनीकाही बालकथादेखील लिहिल्या. समांतर ही त्यातलीच एक दर्जेदार रहस्यकथा आहे. याच नावाने पूर्वी दूरदर्शन वर एक मालिका आणि सध्या एक वेबसिरीज प्रसारीत झाली होती.  ‘मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली… त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो’ या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चाळवण्याचीही! कुमार महाजन चारचौघांसारखा तिशीतला तरुण. छोटासा संसार असलेला. पण त्याची आर्थिक ओढाताण होतेय. कुटुंबाचा खर्च वाढतोय पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करता ये...

Book Review - डेल कार्नेगी - अनुवाद - हेमंत सामंत - हाऊ टू एंजॉय युअर लाइफ अँड युअर जॉब - दर्जा - ★★★★

Image
डेल कार्नेगी हे एक प्रसिद्ध लेखक आणि जीवनातील कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. "हाऊ टू एंजॉय युअर लाइफ अँड युअर जॉब" हे त्यांचे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकात कार्नेगी यांनी जीवनातील तणाव, चिंता आणि नोकरीतील अडचणी यावर योग्य उपाय सुचवले आहेत. हे पुस्तक जीवनाला अधिक आनंददायी बनवण्यासाठी तसेच कामातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी वाचकांना मार्गदर्शन करते. पुस्तकाच्या प्रारंभिक भागात कार्नेगी हे जीवनातील तणाव आणि चिंता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी वाचकांना सांगितले की, जरी आपल्याला आपले कार्य आणि जीवन यामध्ये तणाव व अडचणी येत असतील, तरी त्या समस्यांवर चिंतन करण्यापेक्षा त्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ते सांगतात की, जीवनात सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे आणि आपल्याला थोडी सहजता व आनंद मिळविण्यासाठी आपले मानसिक स्थिती सुधारली पाहिजे. दुसऱ्या भागात, कार्नेगी याने नोकरीतील जीवनातील तणाव आणि कष्ट कमी करण्याचे मार्ग सुचवले आहेत. नोकरीतील जास्त तणाव, कार्याची जबाबदारी आणि वेळेचे नियंत्रण याबाबत अनेक वाचकांना अडचणी येतात. कार्नेगी...

Book Review - शिवाजी सावंत - मृत्युंजय दर्जा ★★★★★

Image
शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय" कादंबरीने मराठी साहित्याच्या कक्षेतील एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. १९७३ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी महाभारतातील कर्ण या पात्राच्या जीवनावर आधारित आहे. "मृत्युंजय" केवळ कर्णाच्या जीवनाची कथा सांगत नाही, तर त्याच्या मानसिक, भावनिक आणि तत्त्वज्ञानिक संघर्षांचे सुसंस्कृत आणि गहिर्या पातळीवर विश्लेषण करते. कादंबरीतील कर्ण हा पात्र अत्यंत गोड आणि समर्पकतेने उभा केलेला आहे, जे वाचकाला त्याच्या संघर्षांची आणि त्याच्या अंतर्गत संघर्षांची पूर्णपणे समजून घेण्यास मदत करते. कादंबरीची विशेषता म्हणजे ती कर्णाच्या जीवनातील प्रत्येक घटना, त्याचे निर्णय, त्याचे आत्मबोध आणि त्याची अंतर्गत चळवळ तपासते. कर्ण हा एक असा नायक आहे, जो जन्माने शूद्र असूनही त्याला 'सूर्यपुत्र' म्हणून मान्यता मिळवतो. त्याच्या जीवनातील संघर्ष, त्याचे आदर्श, त्याची प्रेमकथा आणि त्याचे वर्चस्व हे सर्व "मृत्युंजय"मध्ये अत्यंत ठळकपणे दिसून येते. सावंत यांनी कर्णाच्या पात्राला एक अत्यंत विविधतापूर्ण आणि गडद रूप दिले आहे, जिथे त्याचे कर्म, त्याच्या चुकांचे प्र...

पुस्तक परिचय - व्यंकटेश माडगूळकर - नागझिरा

Image
आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... जंगल - काय असतं ? म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल! आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या.  आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्प...

पुस्तक परिचय - सुनंदा अमरापुरकर - खुलभर दुधाची कहाणी

Image
नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या.  असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फ...

Book Review - अरविन्द वैद्य - प्रज्ञावंत 1 भारतीय

Image
गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे. त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन! आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट.  * जगन्नाथ तथा नाना शंकरशेट * दादाभाई नौरोजी * बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय * बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा * रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके * इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन * कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा * डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा * डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण * डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल * एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी * खान अब्दुलगफ्फार खान या पुस्तकात भारतीय प्रज्ञावंतांचा संक्षिप्त जीवनालेख आहे. लेखकाने अत्यंत सोप्या...

Book Review - Pale Blue Dot by Carl Sagan Rating ★★★★

Image
Carl Sagan’s "Pale Blue Dot: A Vision of the Human Future in Space" is a profound meditation on our place in the universe, blending science, philosophy, and a deeply humanistic perspective. Published in 1994, the book is both a follow-up to Sagan’s earlier work, "Cosmos," and a reflection on humanity's potential to explore and inhabit space. The title of the book is derived from a photograph taken by the Voyager 1 spacecraft in 1990, which shows Earth as a tiny dot suspended in the vastness of space. This image serves as a powerful symbol of our fragility and insignificance within the cosmos. Sagan’s evocative prose invites readers to confront the enormity of the universe and our relatively small place within it, prompting deep introspection about our existence and responsibilities. One of the most striking aspects of "Pale Blue Dot" is Sagan’s ability to weave scientific knowledge with philosophical insights. He discusses the vastness of the universe,...

पुस्तक परिचय - संजय सोनवणी - तृतीय नेत्र

Image
विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!           भन्नाट कादंबरी वाचायला हाती घेतली आणि वाचतच राहिलो. खिळवून ठेवणं काय असतं याचा प्रत...

Book Review - Around the World in 80 Days by Jules Verne Rating - ★★★★★

Image
Jules Verne’s classic novel, "Around the World in Eighty Days," first published in 1873, is a captivating adventure that seamlessly blends excitement, humor, and a touch of social commentary. At its core, the story follows Phileas Fogg, an enigmatic English gentleman whose life revolves around punctuality and routine. Fogg's world is turned upside down when he takes on a wager to circumnavigate the globe in just eighty days, a challenge that tests both his resolve and the limits of contemporary travel. The narrative is set against a backdrop of an age rapidly embracing modernity and technological advancement. Verne’s vivid descriptions of the various locales Fogg visits—from the bustling streets of London to the exotic landscapes of India and the Wild West—immerse readers in a rich tapestry of cultures and experiences. Each destination not only serves as a geographical milestone but also offers insights into the societal norms and challenges of the time, highlighting Vern...

पुस्तक परिचय - एस एल भैरप्पा - आवरण आणि सार्थ

Image
छद्मी धर्मनिरपेक्षता आणि ती जोपासणारी कडवी जातीयवादी इकोसिस्टीम समजून येईल या दोन पुस्तकांमधून...... आवरण आणि सार्थ पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्यांनी एकहाती पुरोगाम्यांच्या आव्हानाला साहित्यात उत्तर दिले...आणि ज्यांचे साहित्य समाजाने उचलून धरले ...असे प्रसिद्ध कन्नड लेखक एस_एल_भैरप्पा यांची ही दोन प्रसिद्ध पुस्तकं.  भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले हल्ले, झालेले हल्ले, इतिहासातील हल्ले आणि पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी! लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते.....रक्षाबंधन भेट म्हणून एक चांगली निवड! भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांचे लक्तर या कादंबरीतून भैरप्पा ने वेशीवर टांगून ठेवले आहेत...जे पुरोगामी विचारांचा भुरका तोंडावर घेऊन बसले.. त्यांचा तो भुरका भैरप्पांनी टराटरा फाडला आहे! आवरण गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ एस एल भैरप्पा! आजवर त्यांनी 21कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. त...

बोरिबंदर ते प्रार्थना समाज

Image
"मेट्रो" चौकात कोपऱ्यावरच असलेले "कयानी" हे "इराणी हॉटेल"  तिथे मिळणाऱ्या "ब्रून मस्का आणि सामोसे या साठी प्रसिद्ध आहेच पण इथे मिळणारा "इराणी स्पेशल" चहा जिभेवर खूपवेळ चव ठेऊन जातो. त्या हॉटेल च्या बरोबर समोरच्या वाडीत धोबी तलाव लेन मध्ये असलेली ख्रिश्चन वस्ती पण लक्ष वेधून घेते. आणि पुढची "हमाल वाडी" म्हणजे इथली 100 टक्के मराठी वस्ती. या परिसरात मला आठवते त्या नुसार 3 इराणी कॅफे होती. इराणी हॉटेल म्हणजे आताच्या "कॅफे कॉफी डे" सारखी म्हणजे 1 कॉफी घ्या आणि कितीही वेळ बसा. थोडं पुढे आल की "प्रिन्सेस स्ट्रीट" चा चौक लागतो. असे म्हणतात की इथे "इंग्लंड ची प्रिन्सेस" रहायची म्हणून हे नाव पडले. ते खरेही असेल कारण मी मुंबईत आलो त्या वेळी बघितले होते की या चौका पासून म्हणजे आताचा (jss road) "जगन्नाथ शंकर रोड" पाण्याने धुवून काढत असत.   इथेच कोपऱ्यावर असलेल्या "आल्फ्रेड बिल्डिंग" मध्ये "पारशी डेअरी" होती. तिथे मिळणारे दुधाचे उत्तम प्रकार आणि केक खाल्ले नाहीत असा या परिसरात कोणीही नस...

दास्तां-ए-इराणी

Image
दादर चौपाटीला अरबी समुद्राच्या बरोबर सरळ रेषेत उभे राहिलो की मुंबई महापालिकेचे प्रसिद्ध दिवंगत इंजिनीअर नानासाहेब मोडक यांचा 'उद्यम' बंगला नजरेस पडतो. बंगल्याच्या समोर सेनापती बापट यांचा पुतळा आणि पुतळ्याच्या डाव्या बाजूने डोळे झाकून चालायला लागलात तरी तुमचे पाऊल थेट 'एलओबी'मध्येच पडेल. म्हणजेच 'लाइट ऑफ भारत'. शिवाजी पार्क परिसरातील शेवटचे इराणी हॉटेल. हॉटेल छोटेखानी. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेत गेलात तरी हाऊसफुल्ल. एरवी वातानुकूलित हॉटेलशिवाय न करमणाऱ्या मुंबईकरांना ४० अंश सेल्सिअस उन्हाच्या तडाख्यातही गरगर फिरणाऱ्या पंख्यांच्या इराणी हॉटेलात जाण्यात मात्र भारी उत्साह असतो. त्याचं कारण अर्थातच खिमापाव, ऑम्लेट पाव, ब्रुनमस्का, बनमस्का आणि सदाबहार पानीकम चाय... जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी इराणी हॉटेलची मजा काही औरच असते. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही हॉटेल आता टीचभर वाटतात. मात्र सच्च्या खवय्यांचे पहिले पाऊल इराणी हॉटेलातच पडते. सर्वच इराणी हॉटेलांचा इतिहास मोठा रंजक आणि हजारो आठवणींनी गुंफलेला आहे. 'एलओबी' ही त्यापैकीच एक. ...

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा

Image
आजची हिंदी चित्रपट सृष्टी माझी नाही. बरं झालं आम्ही दादरच्या कॅफे स्विमिंगपुलवर गाणी ऐकत, चहा पीत, सिगरेट ओढत सिनेमावर चर्चा करत होतो, तेव्हा चित्रपट सृष्टीत आज साचलेल्या चिखलाचा मागमूसही नव्हता. एकमेकांवरची गलिच्छ चिखलफेकही नव्हती. आमच्या वेळेला एक म्हण होती, माकडाच्या हातात कोलीत. आता ती म्हण बदलली आहे, आता माकडांच्या हातात चॅनेल अशी नवीन म्हण अस्तित्वात आलेली आहे. त्या काळात फिल्मी माणसांना शिखंडी बनवून राजकीय अर्जुन शरसंधान करत नव्हते. धार्मिक आणि राजकिय स्तरावर ती चित्रपट सृष्टी दुभंगलेली नव्हती. सिनेमातल्या माणसांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आणि बाहेरून चित्रपट सृष्टीत आलेले कलाकार मंडळी असा वर्ण वर्चस्वाचा खेळ नव्हता. न कुणीतरी परदेशात बसलेला डॉन कठपुतली प्रमाणे नट नट्या आपल्या तालावर नाचवत होता. ना एकमेकांच्या करिअर संपवण्याच्या वल्गना होत किंवा सुपारी दिली जाई.  ती आमची चित्रपट सृष्टी नंदनवन नव्हती. आदर्शवतही नव्हती. पण इतकी किडलेली कधीच नव्हती. त्यावेळी अर्थात बरीच मंडळी चित्रपट सृष्टीत सामान्य कुटुंबातून येत. आणि कष्टाने, आपल्या गुणवत्तेने मोठे होत. मग तो अशोक कुमार असो,...