लज्जा - तस्लीमा नसरीन (अनु. लीना सोहोनी) (दर्जा ***)
१९७२ साली भारताने बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी हा देश आपले हे उपकार एवढ्या लवकर विसरेल असे वाटले नव्हते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच या देशाने इस्लामिकरण चालू केले, आणि देशातील इतर जमातींना या ना त्याप्रकारे देशाबाहेर हाकलून द्यायला सुरु केले. १९९२ चे बाबरी मशिद प्रकरण तेथिल हिंदू लोकांना बाहेर हाकलण्यास पुरेसे होते. तस्लिमा नसरीन यांनी लिहीलेले हे पुस्तक बाबरी मशिद उध्वस्त झाल्यानंतरच्या बांग्लादेशमधिल परीस्थितीचा आढावा घेते. त्यासाठी तिने सुरंजन नावाच्या काल्पनिक हिंदू पात्राचा आणि त्याच्या कुटूंबियांवर गुदरलेल्या प्रसंगाचा आधार घेतला आहे. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी तेथे हिंदुंचे प्रमाण जवळ्जवळ २० टक्के होते ते आता ५ टक्के राहीले आहे. यावरुनच किती लोकांनी तिथून पलायन केले आहे हे लक्षात येते. या लोकांचे गंतव्यस्थान भारत असणार हे वेगळे सांगायला नको. आधिच प्रचंड लोकसंख्येच्या बोज्याखाली चिरडलेल्या भारताला आणखी किती निर्वासितांचा बोजा सोसावा लागणार आहे कोण जाणे. काही वर्षांपुर्वीच फिजीतून भारतीय लोकांना हाकलण्यात आले. आता मलेशियातील भारतीय लोकांवर अत्याच...