Posts

Showing posts from November, 2024

Book Review - शिवाजी सावंत - मृत्युंजय दर्जा ★★★★★

Image
शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय" कादंबरीने मराठी साहित्याच्या कक्षेतील एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. १९७३ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी महाभारतातील कर्ण या पात्राच्या जीवनावर आधारित आहे. "मृत्युंजय" केवळ कर्णाच्या जीवनाची कथा सांगत नाही, तर त्याच्या मानसिक, भावनिक आणि तत्त्वज्ञानिक संघर्षांचे सुसंस्कृत आणि गहिर्या पातळीवर विश्लेषण करते. कादंबरीतील कर्ण हा पात्र अत्यंत गोड आणि समर्पकतेने उभा केलेला आहे, जे वाचकाला त्याच्या संघर्षांची आणि त्याच्या अंतर्गत संघर्षांची पूर्णपणे समजून घेण्यास मदत करते. कादंबरीची विशेषता म्हणजे ती कर्णाच्या जीवनातील प्रत्येक घटना, त्याचे निर्णय, त्याचे आत्मबोध आणि त्याची अंतर्गत चळवळ तपासते. कर्ण हा एक असा नायक आहे, जो जन्माने शूद्र असूनही त्याला 'सूर्यपुत्र' म्हणून मान्यता मिळवतो. त्याच्या जीवनातील संघर्ष, त्याचे आदर्श, त्याची प्रेमकथा आणि त्याचे वर्चस्व हे सर्व "मृत्युंजय"मध्ये अत्यंत ठळकपणे दिसून येते. सावंत यांनी कर्णाच्या पात्राला एक अत्यंत विविधतापूर्ण आणि गडद रूप दिले आहे, जिथे त्याचे कर्म, त्याच्या चुकांचे प्र...

पुस्तक परिचय - व्यंकटेश माडगूळकर - नागझिरा

Image
आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... जंगल - काय असतं ? म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल! आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या.  आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्प...

पुस्तक परिचय - सुनंदा अमरापुरकर - खुलभर दुधाची कहाणी

Image
नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या.  असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फ...