Posts

Showing posts from July, 2026

अनिल लांबा - फ्लर्टींग विथ स्टॉकस् ★★★

Image
अनिल लांबा यांच्या फ्लर्टींग विथ स्टॉकस् या पुस्तकातील एक छोटा उतारा एकदा एका वर्तमानपत्रात माझ्या वाचनात आला. तो मला अत्यंत उत्कंठावर्धक वाटला आणि मी हे पुस्तक वाचायचे ठरवले. त्या उताऱ्यात शेअरमार्केट संदर्भातल्या लोकांच्या आयुष्यातला एक छान प्रसंग चित्रित केला होता. त्या उताऱ्यावरून हे पुस्तक काहीसे कथा स्वरूपात आहे असे माझे मत झाले होते. पण हे पुस्तक वाचायला घेतल्यावर माझी निराशा झाली. हे पुस्तक एक स्टॉक मार्केटचे मॅन्युअल असून त्यात त्यातील विविध संदर्भांचा अर्थ सांगितला आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रत्यक्ष जीवनातले गंमतीदार प्रसंग फार कमी दिलेले आहेत. लेखक अनिल लांबा हे एक चार्टर्ड अकाऊंटंट असल्यामुळे त्याचा प्रभाव या पुस्तकावर पडला आहे. एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटने (गुंतवणूकदाराने नव्हे) स्टॉक मार्केटचे विश्लेषण कंपन्यांच्या नफा-नुकसानीच्या (बॅलेन्स शीट) आकडेवारीवरुन कसे करावे, त्यातील विवध संदर्भांचा अर्थ काय याचा विचार पुस्तकात केला आहे. परंतु सर्वसाधारण गुंतवणूकदार हे आकडे कसे फसवे असतात हे जाणतो. चांगली कंपनी शोधण्यासाठी कुठल्याही आकडेवारीचा अभ्यास करण्याची गरज नसते. कुठल्याही...

ना रुजला विचार...ना बहरला सहकार..!

Image
पश्चिम महाराष्ट्राने सहकाराच्या बळावर आर्थिक क्रांती घडवली. साखर कारखाने उभे राहिले, दूध संघ वाढले, सहकारी बँकांचे जाळे विस्तारले आणि गावोगावी रोजगार निर्माण झाला. मात्र, कोकण  नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असूनही सहकाराच्या बाबतीत मागे राहिला. हा केवळ भौगोलिक प्रश्न नाही, तर मानसिकतेचा प्रश्न आहे.कोकणात आंबा आहे, काजू आहे, मासेमारी आहे, पर्यटन आहे, मेहनती लोक आहेत. मग सहकार का वाढला नाही? कारण इकडे एखादी व्यक्ती पुढे जात असेल, एखादी संस्था उभी राहत असेल तर त्याला हात देण्याऐवजी त्याचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू होते. गटबाजी, अहंकार आणि वैयक्तिक वैर यामध्ये सामूहिक हित हरवून जाते. शेतकरी आणि सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी जिथे प्रशासन कमी पडत होते तिथे सहकार एक संजीवनी ठरला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकार जोमाने वाढला. तिकडे सहकाराच्या रोपट्याचा वटवृक्ष बनवला. कोकणात मात्र सहकार म्हणावा तसा रुजला नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे कोकणवासीयांनी मानसिकता. ती बदलणे हे आजही आव्हान आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आपली राजकीय पकड मजबूत करून किंवा मजबूत करण्यासाठ...

अरुण साधू - ड्रॅगन जागा झाल्यावर ★★★★

Image
मराठी साहित्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण, जागतिक घडामोडी आणि परकीय देशांचा इतिहास यांवर सखोल व अभ्यासपूर्ण लेखन करणारे मोजकेच लेखक आहेत; त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे 'ड्रॅगन जागा झाल्यावर' हे पुस्तक चीनच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उत्थानाचा अत्यंत बारकाईने वेध घेणारे एक महत्त्वाचे साहित्य आहे. 'ड्रॅगन' हे चीनचे जागतिक प्रतीक मानले जाते. शतकानुशतके स्वतःच्याच कोषात असलेला आणि एकाधिकारशाहीच्या झोपेत असलेला हा 'ड्रॅगन' जेव्हा जागा होतो, तेव्हा तो जागतिक राजकारणासाठी, अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः भारतासारख्या शेजारी राष्ट्रासाठी किती मोठे आव्हान निर्माण करू शकतो, याचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. बऱ्याचदा भारतीय लेखकांकडून चीनबद्दल लिहिल्या जाणाऱ्या साहित्यात १९६२ च्या युद्धाची कटुता किंवा एक 'शत्रू राष्ट्र' म्हणून असलेला पूर्वग्रह डोकावतो. मात्र, अरुण साधू यांनी एका कसलेल्या पत्रकाराच्या भूमिकेतून चीनकडे अत्यंत तटस्थपणे पाहिले आहे. चीनच्या प्रगतीचे श्रेय त्यांना देताना लेखका...

किंगशुक नाग - किंगफिजर ★★★★

Image
विठ्ठल माल्या हे अत्यंत हुशार बिजनेसमेन होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अत्यंत कंजूषपणे बिजनेस चालवला आणि शून्यातून यूनायटेड ब्रेवरीजचे साम्राज्य विकसित केले. कंपन्यांचे बॅलेन्स शिट तपासण्यात वाकबगार असलेले विठ्ठल, तोट्यात चाललेले उद्योग विकत घ्यायचे आणि ते आपल्या उद्योगात सामाऊन घेऊन आपल्या व्यवस्थापन कौशल्यातून ते फायद्यात आणायचे. आपले संपूर्ण आयुष्य ते अत्यंत साधेपणाने राहीले. आपल्या एकेक पैशाचा हिशेब ते अत्यंत सचोटीने ठेवायचे. 1983 मध्ये त्यांच्या अकाली मृत्युनंतर हे साम्राज्य विजय माल्या यांच्या पदरात पडले. त्याची त्यांनी कशी वाट लावली याचा वृत्तान्त या पुस्तकात आहे.  सुरुवातीला बाप से बेटा सवाई या न्यायाने विजय मल्ल्या यांनी कंपनीची भरपूर प्रगती केली, परंतु कालांतराने या यशाची नशा त्यांच्या डोक्यात शिरली. त्यांनी त्यांच्या भोवती खुशमस्कारांची प्रभावळ निर्माण केली. साहेबांची थुंकी झेलायची एवढेच त्यांचे काम होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयावर विजय माल्ल्या यांची दिशाभूल केली. जे त्यांना योग्य मार्गदर्शन करत होते त्यांचे ते ऐकेनासे झाले. त्यांचे वर्तन आपल्या वडिलांच्या बिल...