विजय देवधर - केजिबी चे अंतरंग दर्जा - *****
रहस्यकथा, गूढकथांचे लेखन करण्यात हातखंडा असलेले लेखक आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम कादंबऱ्यांना मराठी वाचकांपर्यंत नेणारे अनुवादक विजय देवधर हे मराठीतील एक लोकप्रिय लेखक आहेत. देवधर यांनी गेली सुमारे तीन दशके वाचकांना एका वेगळ्या विश्वाचे दर्शन घडविले. गूढ, अद्भुत, रहस्य, चमत्कार, साहस, शौर्य, इतिहास यांचे त्यांना आकर्षण होते. या अद्भुतरम्य जगाच्या ओढीनेच त्यांनी कादंबऱ्या आणि कथांचे लेखन केले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरिऑलॉजी’ या हवमानशास्त्राशी संबंधत संस्थेत नोकरी करीत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रारंभी ‘विचित्र विश्व’, ‘नवल’मधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. अगाथा ख्रिस्ती, सिडनी शेल्डन, आयर्विंग वॅलेस, फ्रेडरिक फोरसिथ, जेम्स हॅडली चेस, इयान फ्लेमिंग अशा इंग्रजीतील लोकप्रिय लेखकांच्या कादंबऱ्यांचे त्यांनी अनुवाद केले. मात्र ते अनुवाद न वाटता मूळ कलाकृतीच वाटावी, एवढे सरस उतरले आहेत. या वैशिष्ट्यामुळे मेमरीज ऑफ मिडनाइट, डुम्सडे कॉन्स्पिरसी, रेज ऑफ एंजल्स, ब्लड लाइन, सेवन्थ सिक्रेट, डेझर्टर आदी अनुवादित पुस्तकांमध्ये वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य होते.
अनुवाद करताना त्यांना वाचकाचा कधी विसर पडला नाही. म्हणूनच इंग्रजीतील वर्णने मराठीत उतरवताना त्यावर आवश्यक ते संस्कार ते करीत असत. घटनांचे ओघवते वर्णन, व्यक्तिचित्रण आणि नेमकी शब्दयोजना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनुवादित पुस्तकांमध्ये मांसाहारी पदार्थ, मद्य, अमली पदार्थ आदींची वर्णने असत; पण देवधर शुद्ध शाकाहारी होते. मद्यपान तर लांबच. मात्र अनुवाद करताना ते या साऱ्यांचा अभ्यास करीत. एखाद्या मांसाहारी पदार्थाचे वर्णन करताना तो केवळ अनुवाद नसे, तर त्या पदार्थाची कृती ते समजून घेत. त्यामुळेच त्यांचे अनुवाद इतरांपेक्षा वेगळे होते.
केवळ मनोरंजनच नव्हे; तर एका वेगळ्या विश्वाची वाचकाला ओळख व्हावी, माहिती व्हावी अशी त्यांची भूमिका होती. त्यातूनच ‘केजीबीचं अंतरंग’ उभे राहिले. हिचकॉकच्या रहस्यदालनात, कार्लसनची जलपरी, साहसांच्या जगात हे त्यांचे कथासंग्रहही वाचकप्रिय ठरले. बालसाहित्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. मजेदार प्राणी, मोटारसायकलिस्ट चिम्पांझी, प्राण्यांचा डॉक्टर, वाघ सिंह माझे मित्र, प्राणिमित्रांच्या जगात ही पुस्तके त्यांनी लहानांसाठी लिहिली. ‘बर्म्युडा ट्रँगल’सारखे विज्ञानविषयक पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. दिवाळी अंक, साप्ताहिके आणि मासिकांमधूनही त्यांनी विपुल लेखन केले. देवधर हे प्रकाशकांचे आवडते लेखक होते. कारण ते ‘खपणारे’ लेखक तर होतेच; शिवाय त्यांचे अक्षर अतिशय सुंदर होते. व्याकरणाचे सर्व नियम पाळून ते लेखन करीत. असे लेखक आता विरळाच. मराठी साहित्यातील अद्भुतरम्यतेची उणीव भरून काढणारे देवधर त्यांच्या अनुवादांमुळे वाचकांच्या कायम स्मरणात राहतील.
के.जी.बी. ही रशियन गुप्तचर संघटना स्वतःसंबंधी कमालीची गुप्तता पाळते. तसे पाहू गेले, तर रशियाच्या अंतर्गत, राजकीय व सामाजिक घडामोडींबद्दल जगाला कधी फारशी माहिती मिळत नाही. याच गोष्टीवरून ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी रशियाला ‘पोलादी पडदा’ (IRON CURTAIN) असे संबोधले होते. तथापि अलीकडच्या काळात रशियाच्या बर्याच गुप्त गोष्टी जगाला समजल्या आहेत. पाश्चिमात्य गुप्तचर संघटनांनी मिळविलेल्या माहितीवरून आणि रशियातून पळून येऊन, पश्चिमेचा आश्रय घेतलेल्या रशियन गुप्तवार्ता खात्यातल्या काही अधिकार्यांकडून समजलेल्या गोष्टींवरून सोवियत रशियाचे आणि त्यांची गुप्तचर संघटना के.जी.बी. हिचे स्वरूप बरेचसे स्पष्ट झाले आहे.
प्रस्तुत पुस्तकात केवळ के.जी.बी.ची माहितीच दिली आहे असे नाही, तर या गुप्तचर संघटनेशी संबंधित असलेल्या काही अतिशय वेधक अशा कथांचा समावेशही या पुस्तकात केलेला आहे.
पहिल्या कथेत फ्रेंच राजदूत मॉरिस दीजाँ यांचे चारित्र्यहनन करण्याचा आणि त्यांना भ्रष्ट करण्याचा जो धूर्त डाव के.जी.बी.ने टाकला होता, त्याची विलक्षण मनोवेधक अशी हकीकत आहे. ‘स्त्री’ हा दीजाँचा वीक पॉइंट लक्षात घेऊन, एका अतिशय सौष्ठवपूर्ण नि बांधेसूद शरीराच्या रशियन सुंदरीच्या साहाय्याने दीजाँना के.जी.बी.ने कसे भ्रष्ट केले याचे विलक्षण दर्शन प्रस्तुत कथेत घडते.
दुसर्या कथेमध्ये एक फितूर अमेरिकन सोल्जर सार्जंट रॉबर्ट ली जॉन्सन याला आपल्या वेठीस धरून फ्रान्समधल्या पेंटॅगॉनच्या अभेद्य अशा गुप्त तिजोरीतली लष्करी गुपिते के.जी.बी.ने कशी हस्तगत केली, याची कल्पिताहूनही अद्भुत अशी सत्य हकीकत आहे. जिथे मुंगीलाही प्रवेश मिळणे अशक्य होते, अशा त्या ‘सिक्रेट व्हॉल्ट’ मध्ये शिरकाव करून घेण्यासाठी के.जी.बी.ने धूर्तपणे कोणत्या युक्त्याप्रयुक्त्या नि हिकमती लढवल्या याचे मती गुंग करणारे प्रत्यंतर वाचकांना येईल.
‘मिराज विमान पळविण्याचा कट’ या तिसर्या कथेमध्ये लेफ्टनंट महमुद मात्तार नावाच्या एका लेबानीज फायटर पायलट माणसाला कचाट्यात पकडून के.जी.बी.ने त्याला हेरकामास कसे जुंपले याचे विदारक दर्शन आहे.
के.जी.बी.ची माहिती आणि तिची काही प्रकरणे सांगतासांगताच अशा कथांचा प्रस्तुत पुस्तकात अंतर्भाव केल्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरेल आणि वाचकांना आवडेल, अशी आशा आहे. हे संबंध पुस्तक विचार करायला लावणारे आहे. एक गुप्तचर संघटना आपली उद्दिष्टे साध्य करण्याकरता कोणकोणत्या उलाढाली करते, आपल्या मोहिमा राबवण्याकरता काय काय गोष्टी करते याचे दर्शन घडवणे हा या पुस्तकाच्या लेखनामागचा हेतू आहे. के.जी.बी.चे हे अंतरंग वाचताना-राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम अशी गुप्तचर व्यवस्था किती आवश्यक नि महत्त्वपूर्ण असते, याचा प्रत्यय वाचकांना जागोजाग येईल.
विजय देवधर यांच्या केजीबी चे अंतरंग हे पुस्तक १९८० साली प्रकाशित झाले. हे पुस्तक केजीबी या सोव्हिएत गुप्तचर संस्थेच्या कार्यपद्धती आणि इतिहासावर आधारित आहे. देवधर हे एक प्रतिष्ठित पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांनी केजीबी च्या अनेक पूर्वीच्या अधिकाऱ्यांशी मुलाखत घेतली आणि त्यांच्याकडून माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिले. केजीबी ही एक अतिशय शक्तिशाली गुप्तचर संस्था होती. तिने सोव्हिएत संघाच्या राजकीय आणि लष्करी धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. केजीबी ने जगभरातील अनेक देशांमध्ये गुप्तचर कार्ये केली आणि अनेक राजकीय उलथापालथी घडवून आणल्या. देवधर यांनी केजीबी च्या कार्यपद्धतीचे एक तपशीलवार वर्णन केले आहे. ते दाखवतात की केजीबी ने आपल्या गुप्तचर कार्यांसाठी कसे तंत्रज्ञान आणि मनोविज्ञानाचा वापर केला. ते केजीबी च्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांचीही माहिती देतात. केजीबी चे अंतरंग हे एक महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. हे पुस्तक सोव्हिएत संघ आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांना एक उत्तम प्रारंभिक बिंदू आहे.
Comments
Post a Comment