Posts

Showing posts from October, 2026

सुरेशचंद्र नाडकर्णी - पृथ्वीवर माणूस उपराच ★★★★★

Image
या अफाट विश्वात जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच का आहे ? हे माणसाला अनेक वर्ष पडलेले कोडे आहे. अब्जावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर फक्त मानव जातच का विकसित झाली ? इतर प्राणी अप्रगत का राहीले ? हाही एक मोठ्ठा यक्षप्रश्न आहे. एरिक वॉन डेनीकेन या शास्त्रज्ञाने आपली सगळी हयात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात घालवली. या शास्त्रज्ञाच्या शोधांचा सार सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी या पुस्तकात दिलेला आहे. हा विषय तसा अत्यंत गहन आणि क्लिष्ट आहे. नाडकर्णी यांनी अनेक वर्षांचे हे संशोधन अनेक चित्रांसकट या छोटेखानी पुस्तकात सर्वसामान्य वाचकांसाठी सुलभ भाषेत मांडले आहे. काही लोकांना या पुस्तकात मांडलेले मत अतिशयोक्तिपूर्ण आणि काल्पनिक वाटण्याची शक्यता आहे. तुम्ही कशाप्रकारे विचार करता यावर हे अवलंबून आहे. तुम्ही पारंपारीक आणि आध्यात्मिक विचारसरणीचे असाल, तर या पुस्तकतील देव म्हणजे परग्रहावरील अंतराळवीर होते ही कल्पना रुचणार नाही. सकाळमध्ये हे पुस्तक लेखमालिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध करताना, अनेक वरिष्ठ वाचकांनी त्याला विरोध केला होता असे खुद्द लेखकानेच प्रस्तावनेत सांगितले आहे. या पुस्तकात आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठ...

निरंजन घाटे - स्वप्नचौर्य ★★★★

Image
आधुनिक मराठी विज्ञान कथांचे भीष्म पितामह कोण असे कोणी विचारले तर निरंजन घाटे यांचे चित्र समोर उभे राहते. मी कॉलेजला असल्यापासून त्यांच्या विविध विज्ञान कथांचा आणि विज्ञान लेखनाचा आस्वाद घेतला आहे. त्यांचे कथा लेखन ओघवते आणि चातुर्यपूर्ण असते. स्वप्नचौर्य हा एक कथासंग्रह माझ्या वाचनात आला. विज्ञानकथांचे पितामह या नात्याने त्यांच्याकडून अपेक्षा फार असतात, पण प्रत्येक वेळी हे रसायन जुळून येईलच असे काही नाही. अगदी पहिल्या 'पराभूत' या कथेने माझी निराशा केली. घाटे सर नेहमी त्यांच्या कथा एका अंधारात सुरू करतात. निम्मी कथा वाचेपर्यन्त कशाचा पायपोस कशाला लागत नाही. आणि कथेच्या अगदी शेवटी त्या कथेतील विज्ञानाचा उलगडा  करतात. या कथेचे असेच झाले आहे. अगदी निम्याहून अधिक कथा संपेपर्यंत काय चालले आहे ते समजत नाही. कुठले पात्र कोणाचे काय लागते हे न समजल्यामुळे बराच गोंधळ उडतो. घाटे सरांनी कथा सुरुवात करताना, कथेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे वाचकांच्या दृष्टीने सोईचे ठरेल असे वाटते. अयोनिज या कथेत मानवी क्लोनिंगची कल्पना सुचवून शेवटी अचानक त्याचा ज्योतिष शास्त्राशी संबंध लावून थोडी निराशा केल...