Posts

Showing posts from September, 2026

दक्ष त्यागी - अ नेशन ऑफ इडियटस ★★★

Image
दक्ष त्यागी हे नाव आधी कधी ऐकले नव्हते. एकदा सहज अॅमेझोनवरील बुकस्टोर चाळत असताना, अ नेशन ऑफ इडियटस हे पुस्तक दिसले. नावावरूनच हे पुस्तक एखाद्या 'दिमागी नक्षल' ने लिहिले असण्याची दाट शक्यता वाटली. ते काही प्रमाणात खरेही ठरले. या पुस्तकात भारतीय पारंपारीक रूढी, कल्पना इत्यादींना वेड्यात काढले आहे. काही गोष्टी निंदनीय आहे हे जरी खरे असले, तरी काही गोष्टी परंपरा जतन करण्यासाठी आवश्यकही असतात. प्रत्येक गोष्ट कम्युनीस्ट लेन्स मधून पाहून चालत नाही. या कम्युनीस्ट विचारसरणीतही अनेक त्रुटी आहेत हे 'दिमागी नक्षलवादी' सोईस्करपणे विसरतात. हा दक्ष त्यागी त्यातलाच एक दिसतो. प्रत्येक प्रस्थापीत गोष्टींविरुद्ध बंड करायचे ही यांची मानसिकता असल्याचे दिसून येते. या पुस्तकातील बुद्धीला न पटणारा विरोधाभास जर बाजूला ठेवला तर तसे हे पुस्तक वाचण्याजोगे मनोरंजक झालेले आहे. भारतातील काही गोष्टी पारंपारीक रिवाज म्हणून मान्यताप्राप्त आहेत. त्यांच्या इतिहास भूगोलाची कोणी चर्चा करत नाही. उदाहरणार्थ भावाने बहिणीला राखी बांधण्याची प्रथा. परंतु भारतातील काही तथाकथित पुरोगामी लोक (ज्यांना हल्लीच मोदीजीं...

जेमी ग्रीन - द पॉसिबिलिटी ऑफ लाईफ ★★★

Image
"ब्रह्मांडात आपण खरोखरच एकटे आहोत का?" हा मानवी इतिहासातील सर्वात गूढ आणि रोमांचक प्रश्न आहे. याच प्रश्नाचा अतिशय रंजक आणि नाविन्यपूर्ण अंगाने वेध घेणारे पुस्तक म्हणजे 'द पॉसिबिलिटी ऑफ लाईफ'. साधारणतः जेव्हा आपण परग्रहवासीयांबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर हॉलीवूड चित्रपटांमधील अवाढव्य डोळे असणारे किंवा पृथ्वीवर हल्ला करणारे जीव येतात. परंतु, जेमी ग्रीन यांचे हे पुस्तक या साच्याबाहेर पडून, विज्ञानाचे नियम आणि मानवी कल्पनाशक्ती यांची सुरेख सांगड घालत एका नव्या विश्वाची सफर घडवते. हे पुस्तक केवळ परग्रहवासीयांच्या शोधापुरते मर्यादित नाही, तर ते 'माणूस असणे म्हणजे नेमके काय?' या अधिक सखोल व तत्त्वज्ञानात्मक प्रश्नाचाही वेध घेते.    हे पुस्तक प्रामुख्याने जीवशास्त्राची उत्पत्ती, एक्झोप्लॅनेट्सचा शोध आणि 'गोल्डीलॉक्स झोन' (जिथे जीवसृष्टी फुलण्यासाठी योग्य तापमान असते) यांसारख्या संकल्पनांभोवती फिरते. १९९२ मध्ये जेव्हा पहिल्या एक्झोप्लॅनेटचा शोध लागला, तेव्हापासून खगोलशास्त्रात एक मोठी क्रांती झाली. ग्रीन यांनी या पुस्तकाची विभागणी 'उत्पत्ती...