Posts

Showing posts from September, 2024

Book Review - Pale Blue Dot by Carl Sagan Rating ★★★★

Image
Carl Sagan’s "Pale Blue Dot: A Vision of the Human Future in Space" is a profound meditation on our place in the universe, blending science, philosophy, and a deeply humanistic perspective. Published in 1994, the book is both a follow-up to Sagan’s earlier work, "Cosmos," and a reflection on humanity's potential to explore and inhabit space. The title of the book is derived from a photograph taken by the Voyager 1 spacecraft in 1990, which shows Earth as a tiny dot suspended in the vastness of space. This image serves as a powerful symbol of our fragility and insignificance within the cosmos. Sagan’s evocative prose invites readers to confront the enormity of the universe and our relatively small place within it, prompting deep introspection about our existence and responsibilities. One of the most striking aspects of "Pale Blue Dot" is Sagan’s ability to weave scientific knowledge with philosophical insights. He discusses the vastness of the universe,...

पुस्तक परिचय - संजय सोनवणी - तृतीय नेत्र

Image
विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!           भन्नाट कादंबरी वाचायला हाती घेतली आणि वाचतच राहिलो. खिळवून ठेवणं काय असतं याचा प्रत...

Book Review - Around the World in 80 Days by Jules Verne Rating - ★★★★★

Image
Jules Verne’s classic novel, "Around the World in Eighty Days," first published in 1873, is a captivating adventure that seamlessly blends excitement, humor, and a touch of social commentary. At its core, the story follows Phileas Fogg, an enigmatic English gentleman whose life revolves around punctuality and routine. Fogg's world is turned upside down when he takes on a wager to circumnavigate the globe in just eighty days, a challenge that tests both his resolve and the limits of contemporary travel. The narrative is set against a backdrop of an age rapidly embracing modernity and technological advancement. Verne’s vivid descriptions of the various locales Fogg visits—from the bustling streets of London to the exotic landscapes of India and the Wild West—immerse readers in a rich tapestry of cultures and experiences. Each destination not only serves as a geographical milestone but also offers insights into the societal norms and challenges of the time, highlighting Vern...

पुस्तक परिचय - एस एल भैरप्पा - आवरण आणि सार्थ

Image
छद्मी धर्मनिरपेक्षता आणि ती जोपासणारी कडवी जातीयवादी इकोसिस्टीम समजून येईल या दोन पुस्तकांमधून...... आवरण आणि सार्थ पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्यांनी एकहाती पुरोगाम्यांच्या आव्हानाला साहित्यात उत्तर दिले...आणि ज्यांचे साहित्य समाजाने उचलून धरले ...असे प्रसिद्ध कन्नड लेखक एस_एल_भैरप्पा यांची ही दोन प्रसिद्ध पुस्तकं.  भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले हल्ले, झालेले हल्ले, इतिहासातील हल्ले आणि पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी! लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते.....रक्षाबंधन भेट म्हणून एक चांगली निवड! भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांचे लक्तर या कादंबरीतून भैरप्पा ने वेशीवर टांगून ठेवले आहेत...जे पुरोगामी विचारांचा भुरका तोंडावर घेऊन बसले.. त्यांचा तो भुरका भैरप्पांनी टराटरा फाडला आहे! आवरण गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ एस एल भैरप्पा! आजवर त्यांनी 21कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. त...

बोरिबंदर ते प्रार्थना समाज

Image
"मेट्रो" चौकात कोपऱ्यावरच असलेले "कयानी" हे "इराणी हॉटेल"  तिथे मिळणाऱ्या "ब्रून मस्का आणि सामोसे या साठी प्रसिद्ध आहेच पण इथे मिळणारा "इराणी स्पेशल" चहा जिभेवर खूपवेळ चव ठेऊन जातो. त्या हॉटेल च्या बरोबर समोरच्या वाडीत धोबी तलाव लेन मध्ये असलेली ख्रिश्चन वस्ती पण लक्ष वेधून घेते. आणि पुढची "हमाल वाडी" म्हणजे इथली 100 टक्के मराठी वस्ती. या परिसरात मला आठवते त्या नुसार 3 इराणी कॅफे होती. इराणी हॉटेल म्हणजे आताच्या "कॅफे कॉफी डे" सारखी म्हणजे 1 कॉफी घ्या आणि कितीही वेळ बसा. थोडं पुढे आल की "प्रिन्सेस स्ट्रीट" चा चौक लागतो. असे म्हणतात की इथे "इंग्लंड ची प्रिन्सेस" रहायची म्हणून हे नाव पडले. ते खरेही असेल कारण मी मुंबईत आलो त्या वेळी बघितले होते की या चौका पासून म्हणजे आताचा (jss road) "जगन्नाथ शंकर रोड" पाण्याने धुवून काढत असत.   इथेच कोपऱ्यावर असलेल्या "आल्फ्रेड बिल्डिंग" मध्ये "पारशी डेअरी" होती. तिथे मिळणारे दुधाचे उत्तम प्रकार आणि केक खाल्ले नाहीत असा या परिसरात कोणीही नस...

दास्तां-ए-इराणी

Image
दादर चौपाटीला अरबी समुद्राच्या बरोबर सरळ रेषेत उभे राहिलो की मुंबई महापालिकेचे प्रसिद्ध दिवंगत इंजिनीअर नानासाहेब मोडक यांचा 'उद्यम' बंगला नजरेस पडतो. बंगल्याच्या समोर सेनापती बापट यांचा पुतळा आणि पुतळ्याच्या डाव्या बाजूने डोळे झाकून चालायला लागलात तरी तुमचे पाऊल थेट 'एलओबी'मध्येच पडेल. म्हणजेच 'लाइट ऑफ भारत'. शिवाजी पार्क परिसरातील शेवटचे इराणी हॉटेल. हॉटेल छोटेखानी. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेत गेलात तरी हाऊसफुल्ल. एरवी वातानुकूलित हॉटेलशिवाय न करमणाऱ्या मुंबईकरांना ४० अंश सेल्सिअस उन्हाच्या तडाख्यातही गरगर फिरणाऱ्या पंख्यांच्या इराणी हॉटेलात जाण्यात मात्र भारी उत्साह असतो. त्याचं कारण अर्थातच खिमापाव, ऑम्लेट पाव, ब्रुनमस्का, बनमस्का आणि सदाबहार पानीकम चाय... जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी इराणी हॉटेलची मजा काही औरच असते. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही हॉटेल आता टीचभर वाटतात. मात्र सच्च्या खवय्यांचे पहिले पाऊल इराणी हॉटेलातच पडते. सर्वच इराणी हॉटेलांचा इतिहास मोठा रंजक आणि हजारो आठवणींनी गुंफलेला आहे. 'एलओबी' ही त्यापैकीच एक. ...

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा

Image
आजची हिंदी चित्रपट सृष्टी माझी नाही. बरं झालं आम्ही दादरच्या कॅफे स्विमिंगपुलवर गाणी ऐकत, चहा पीत, सिगरेट ओढत सिनेमावर चर्चा करत होतो, तेव्हा चित्रपट सृष्टीत आज साचलेल्या चिखलाचा मागमूसही नव्हता. एकमेकांवरची गलिच्छ चिखलफेकही नव्हती. आमच्या वेळेला एक म्हण होती, माकडाच्या हातात कोलीत. आता ती म्हण बदलली आहे, आता माकडांच्या हातात चॅनेल अशी नवीन म्हण अस्तित्वात आलेली आहे. त्या काळात फिल्मी माणसांना शिखंडी बनवून राजकीय अर्जुन शरसंधान करत नव्हते. धार्मिक आणि राजकिय स्तरावर ती चित्रपट सृष्टी दुभंगलेली नव्हती. सिनेमातल्या माणसांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आणि बाहेरून चित्रपट सृष्टीत आलेले कलाकार मंडळी असा वर्ण वर्चस्वाचा खेळ नव्हता. न कुणीतरी परदेशात बसलेला डॉन कठपुतली प्रमाणे नट नट्या आपल्या तालावर नाचवत होता. ना एकमेकांच्या करिअर संपवण्याच्या वल्गना होत किंवा सुपारी दिली जाई.  ती आमची चित्रपट सृष्टी नंदनवन नव्हती. आदर्शवतही नव्हती. पण इतकी किडलेली कधीच नव्हती. त्यावेळी अर्थात बरीच मंडळी चित्रपट सृष्टीत सामान्य कुटुंबातून येत. आणि कष्टाने, आपल्या गुणवत्तेने मोठे होत. मग तो अशोक कुमार असो,...

द्वारकानाथ संझगिरी - मुंबई व्ह्यू - उद्यम

Image
दादर परिसरात तेव्हा मोडक इंजिनीयर यांचा बंगला प्रसिद्ध होता. हे मोडक इंजिनीयर नेमके कोण होते, त्यांचं काम, याबदद्ल आजच्या पिढीला माहिती असणं कठीणच आहे. पण आजची मुंबई या एका माणसामुळे पाणी पिऊ शकते एवढं एक वाक्य सांगितलं तरी मोडक या माणसाच्या कर्तृत्वाची पुरेशी कल्पना येईल. जवळपास रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला जाताना मी ‘उद्यम’ नावाच्या एका बंगल्यावरून जातो. माझ्या लहानपणापासून तो बंगला आमच्या शिवाजी पार्कमधे मोडक इंजिनीयरचा बंगला म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणी कोण हे मोडक इंजिनीयर हा प्रश्न मनात यायचा. माझ्या वडिलांनी ह्य प्रश्नाचं उत्तर मला एका वाक्यात दिलं होतं, ‘‘अरे तू रोज वैतरणाचं पाणी पितोस ना, ते ह्यंच्यामुळे.’’ त्या वेळी वैतरणा हा मुंबईपासून साधारण पाऊणशे मैलावर एक तलाव आहे. तिथे धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी मुंबईत येतं एव्हढंच नागरिकशास्त्र किंवा भूगोलाच्या पुस्तकातून मला कळलं होतं. इंजिनीयर व्हायचं बीज माझ्या मनात रुजलं ते मोडकांच्या कानावर पडत असलेल्या नावामुळे! अर्थात म्हणून मी सिव्हिल इंजिनीयरच झालो हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही. दोन दिवस इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगला बसल्यावर मल...

Book Review - Think and Grow Rich by Napoleon Hill Rating - ★★★★

Image
Napoleon Hill's "Think and Grow Rich," first published in 1937, stands as a seminal work in the genre of personal development and self-help literature. The book is often regarded as one of the most influential works in its field, providing readers with a blueprint for achieving personal and financial success. Rooted in Hill's extensive study of successful individuals and his collaboration with Andrew Carnegie, the book offers a compelling blend of philosophy, psychology, and practical advice. The core of Hill's message revolves around the concept of the "Mastermind Group," the idea that success is not just the result of individual effort but also the product of collective synergy. Hill emphasizes that surrounding oneself with a network of like-minded, supportive individuals can significantly amplify one's chances of achieving goals. This idea is foundational to the book, suggesting that collaboration and mutual support are critical components of succ...