Posts

Showing posts from February, 2024

Gaganyaan Mission - Astronauts

Image
Narendra Modi is the first Prime Minister to visit Isro’s Thiruvananthapuram-based Vikram Sarabhai Space Centre (VSSC) in four decades, where he met the four astronauts-select — Group Captain Prasanth Balakrishnan Nair, Group Captain Angad Pratap, Group Captain Ajit Krishnan and Wing Commander Shubhanshu Shukla —who have been shortlisted for the Gaganyaan mission. At VSSC, PM Modi bestowed ‘astronaut wings’ on the four test pilots after introducing them to the world and called them “the pride of today’s India” who “who will take the aspirations of 140 crore Indians to space”. The profiles of the four astronauts-select: Group Captain Prashanth Balakrishnan Nair: A native of Nenmara in Palakkad in Kerala, Nair completed his schooling in Kuwait where his father was employed. After coming back to India, he did his engineering from NSS College, Akathethara, in Palakkad and joined the NDA course in Khadakwasla and then entered 163rd pilot course at the Air Force Academy from where he passed ...

व्यक्तिचरित्र - मनोहर जोशी

Image
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला. मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले. मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली. 'श...

व्यक्तिचरित्र - अशोक सराफ

Image
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते. त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे. ओळख मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक...

व्यक्तिचरित्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Image
महात्मा फुले यांनी दाखवून दिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शूद्रातिशूद्र बहुजन समाज वर्षानुवर्षे आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहिला होता. त्याला सर्व व संधी नाकारण्यात आल्या होत्या. येथील सर्वच बहुजन समाज सामाजिक अन्यायाचा बळी ठरला होता; परंतु या बहुजन समाजातही सर्वाधिक उपेक्षित असा एक वर्ग होता. तो म्हणजे, दलित किंवा पूर्वापार अस्पृश्य मानल्या गेलेल्या दुर्दैवी लोकांचा वर्ग होय. या वर्गावर होणाऱ्या अन्यायाला पारावारच उरला नव्हता. या उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेले थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. परिचय व कार्य  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. ते महार या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्माला आले असल्याने त्यांना पूर्वायुष्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागला होता. तथापि, या परिस्थितीवरही मार करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अमेरिका, इंग्लंडमधील विद्यापीठांच्या उच्च पदव्या त्यांनी संपादन केल्या आणि आपल्या विद्वत्तेची...

आधुनिक भारताचा इतिहास, लेखक - के सागर, दर्जा - ★★★★★

Image
महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध MPSC या स्पर्धा परीक्षा म्हटल्या की के सागर अथवा क्षीरसागर यांची त्या विषयांवरील पुस्तके प्रमाण मानली जातात. मी स्वत: काही अशा स्पर्धा परीक्षांत सहभागी नसलो तरी या पुस्तकांचे वाचन करून आपले सामान्य ज्ञान वाढवणे मला आवडते. विशेषत: इतिहाचे संक्षिप्त आणि वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी ही पुस्तके अत्यंत उपयुक्त आहेत. क्षीरसागर यांनी ही पुस्तके लिहिताना निष्पक्षपणे त्या विषयाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी कुठल्याही पक्षाची बाजू घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला राजकीय रंग आलेला नाही.  मी इतिहास या शृंखलेतील प्राचीन भारत, मध्य युगीन भारत आणि आधुनिक भारत असे सर्व संच वाचले. आपण आपला इतिहास फक्त शाळेत असताना शिकतो. त्यावेळी आपण शाळेच्या परीक्षेच्या दडपणाखाली असतो. त्यामुळे त्यावेळी तो इतिहास आपल्या डोक्यात शिरत नाही. त्या अभ्यासाचा आपल्याला तिटकारा असतो. सनावळ्या पाठ करून वीट आलेला असतो. त्यामुळे आपण इतिहास शिकत नसून फक्त परिक्षार्थी असतो. एकदा परीक्षा संपली की आपण सगळे विसरून जातो. आता मात्र शाळा कॉलेजचे टेंन्शन संपल्यावर इतिहासाचा अभ्यास सोपा वाटतो. ...

व्यक्तिचरित्र - राजर्षी शाहू महाराज

Image
महात्मा फुल्यांनंतरचे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे दूसरे महान नेते म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख करावा लागतो. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जुलै, १८७४ रोजी झाला. ते दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते. २ एप्रिल, १८९४ रोजी त्यांनी कोल्हापूर राज्याची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतली. राजर्षी शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या सत्तेचा वापर लोककल्याणासाठी केला. त्यांच्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानात अनेक सुधारणा घडून आल्या; त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द अनेक बाबीत उल्लेखनीय ठरली. सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व छत्रपती शाहू महाराजांचे सर्वांत उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे केलेले नेतृत्व हे होय. महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळ निष्प्राण होत चालली होती; परंतु शाहू महाराजांनी या चळवळीला संजीवनी देऊन तिच्यात नवचैतन्य निर्माण केले. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरे वारसदार होते. महात्मा फुले यांच्याप्रमाणेच राजर्षी शाहूंनी बहुजन समाजाला संघटित करून त्याला ...

व्यक्तिचरित्र - चंद्रशेखर आझाद

Image
या काळातील क्रांतिकारक चळवळीचे आणखी एक प्रभावी नेते म्हणून चंद्रशेखर आझाद यांचा उल्लेख केला पाहिजे. चंद्रशेखर आझाद हे देखील सरदार भगतसिंग यांचे एक प्रमुख साथीदार होते. 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संघटनेचे ते नेते होते. चंदशेखर आझाद यांनी सरकारविरुद्ध अनेक क्रांतिकारक कारवायांमध्ये भाग घेतला होता. शस्त्रास्त्रे तयार करणे, सरकारी खजिन्यांची लूट करणे, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करणे यांसारखे कार्यक्रम आझाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले होते. काकोरी कट खटला चंदशेखर आझाद यांचे नाव काकोरी कट खटल्याच्या निमित्ताने प्रथम लोकांपुढे आले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनसिंह ठाकूर, अशफाकू उल्ला खान इत्यादी क्रांतिकारकांनी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेगाडी अडवून सरकारी खजिन्याची लूट केली. सरकारने या क्रांतिकारकांना पकडून त्यांच्यावर खटला भरला. हा खटला 'काकोरी कट खटला' या नावाने प्रसिद्ध आहे. या खटल्यातील काही आरोपींना फाशीची तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. चंद्रशेखर आझाद हे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यां...

व्यक्तिचरित्र - सरदार भगतसिंग

Image
सरदार भगतसिंग यांना 'भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी' असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळींमध्ये भगतसिंगांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांचे संपूर्ण घराणेच क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होते. पंजाबमधील प्रसिद्ध क्रांतिकारक अजितसिंग हे त्यांचे चुलते होत. भगतसिंगांचे वडील किसनसिंग व आणखी एक चुलते हे देखील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. भगतसिंग यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. स्वतंत्र भारतात समाजवादी पद्धतीची समाजरचना निर्माण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. इंग्रज राज्यकर्त्यांना आपल्या देशातून हाकलून लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहे; तथापि, स्वतंत्र भारतात गोरगरीब-कष्टकरी जनतेला न्याय मिळेल अशी समाजव्यवस्था निर्माण करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, असे त्यांचे म्हणणे होते. भगतसिंग यांचा सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास होता. जुलमी इंग्रज राज्यकर्त्यांशी शस्त्रांच्या मार्गानेच मुकाबला केला पाहिजे; कारण त्यांना केवळ शस्त्रांचीच भाषा समजते, असे त्यांनी म्हटले होते. सशस्त्र क्रांतीशिवाय देशाला तरणोपाय नाही, असे त्यांचे ठाम मत होते. हिंदुस्थान सोशॅ...

व्यक्तिचरित्र - स्वामी विवेकानंद

Image
परिचय व कार्य स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण मिशनचे संस्थापक होत. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते. बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर त्यांनी हिमालयात सहा वर्षे योगसाधना केली. पुढे त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर भ्रमण केले. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व सुरेंद्रनाथ मित्र यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी नोव्हेंबर, १८८१ मध्ये विवेकानंदांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी प्रथम परिचय झाला. ही घटना विवेकानंदांच्या जीवनास कलाटणी देणारी ठरली. योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते असा रामकृष्णांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला व ते रामकृष्णांचे पट्टशिष्य बनले. या प्रभावामुळे ते सनातन हिंदुधर्म व तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले. शिकागो धर्मपरिषद स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा संदेश इंग्लंड, अमेरिका या पाश्चात्त्य देशांतही पोहोचविला. अमेरिकेतील शिकागो या शहरामध्ये भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर, १८९३ रोजी त्यांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली आणि या धर्माची श्रेष्ठता व उदात्...