व्यक्तिचरित्र - स्वामी विवेकानंद

परिचय व कार्य

स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण मिशनचे संस्थापक होत. त्यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते. बी. ए. ची पदवी संपादन केल्यावर त्यांनी हिमालयात सहा वर्षे योगसाधना केली. पुढे त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानभर भ्रमण केले.

रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व

सुरेंद्रनाथ मित्र यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी नोव्हेंबर, १८८१ मध्ये विवेकानंदांचा रामकृष्ण परमहंस यांच्याशी प्रथम परिचय झाला. ही घटना विवेकानंदांच्या जीवनास कलाटणी देणारी ठरली. योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते असा रामकृष्णांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला व ते रामकृष्णांचे पट्टशिष्य बनले. या प्रभावामुळे ते सनातन हिंदुधर्म व तत्त्वज्ञान यांचे समर्थक बनले.

शिकागो धर्मपरिषद

स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा संदेश इंग्लंड, अमेरिका या पाश्चात्त्य देशांतही पोहोचविला. अमेरिकेतील शिकागो या शहरामध्ये भरलेल्या जागतिक सर्वधर्मपरिषदेत ११ सप्टेंबर, १८९३ रोजी त्यांनी हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली आणि या धर्माची श्रेष्ठता व उदात्तता सर्वांना पटवून दिली; त्यामुळे त्यांना परदेशातही अनेक शिष्य मिळाले.

रामकृष्ण मिशन

१ मे, १८९७ रोजी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची कोलकाता येथे स्थापना केली. साधन आहे. मेलः प्राप्तीचीत मार्ग वेगवेगळा असला तरी सर्व धर्मांचे ध्येय एकच आहे. आत्मा सो क्षात्कार घडवून आणण्यास मूर्तिपूजा साहाय्यभूत ठरते, अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती.

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व

स्वामी विवेकानंदांनी जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. सनातन हिंदू धर्माच्या आधारे व्यापक विश्वधर्माचा जगाला संदेश देणे, हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व लोकांना पटवून देणे इत्यादी कामे या मिशनने केली. हिंदू धर्म हा मानवतावादी धर्म आहे, तो विश्वधर्म आहे. हिंदू धर्म जगाचे नेतृत्व करू शकेल; परंतु त्यासाठी त्यातील जातीयतेसारखे दोष दूर केले पाहिजेत, असे रामकृष्ण मिशनचे प्रतिपादन होते.

लोकोपयोगी कार्य

रामकृष्ण मिशनने ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्तीवर लोकसेवेचे कार्यही हाती घेतले. धार्मिक सुधारणांबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी या मिशनने बरेच प्रयत्न केले. याशिवाय मिशनच्या वतीने ठिकठिकाणी अनाथाश्रम, रुग्णालये, वसतिगृहे, यांची स्थापना करण्यात आली. महापूर, दुष्काळ, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी रामकृष्ण मिशनने पुढाकार घेतला. भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्यही मिशनने केले

विवेकानंदांचा मृत्यू 4 जुलै 1902 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी झाला. 

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)