भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 6
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥
शब्दार्थ
युधामन्यु: - युधामन्यू
च - आणि
विक्रान्त: - पराक्रमी
उत्तमौजा: - उत्तमौजा
च - आणि
वीर्य-वान् - अत्यंत शक्तिशाली
सौभद्र: - सुभद्रेचा पुत्र
द्रौपदेया: - द्रौपदीपुत्र
च - आणि
सर्वे - सर्व
एव - निश्चितपणे
महा-रथा: - महारथी
अर्थ
तेथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत.
Comments
Post a Comment