भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 9

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।

नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥


शब्दार्थ

अन्ये - इतर सर्व

च - सुद्धा

बहव: - मोठ्या संख्येने

शूरा: - शूरवीर

मत्-अर्थे - माझ्यासाठी

त्यक्त-जीविता: - प्राण धोक्यात घालण्यास सज्ज आहेत

नाना - अनेक

शस्त्र - शस्त्रे

प्रहरणा: - युक्त, सुसज्जित

सर्वे - ते सर्व

युद्ध-विशारदा: - युद्धकलेत निपुण असलेले.


अर्थ

माझ्यासाठी स्वत:च्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत.


तात्पर्य

जयद्रथ, कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्धांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा