भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 7

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।

नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥


शब्दार्थ

अस्माकम् - आपले

तु - परंतु

विशिष्टा: - विशेष बलशाली

ये - जे

तान् - त्यांना

निबोध - नीट जाणून घ्या

द्विज-उत्तम - हे ब्राह्मणश्रेष्ठा

नायका: - नायक, सेनापती

मम - माझ्या

सैन्यस्य - सैन्याचे

संज्ञा-अर्थम् - जाणून घेण्यासाठी

तान् - त्यांना

ब्रवीमि - मी सांगतो

ते - तुम्हाला


अर्थ

हे ब्राह्मणश्रेष्ठ! तुमच्या माहितीकरिता, माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा