भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 23


योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥

शब्दार्थ

योत्स्यमानान् - लढणार्‍यांना

अवेक्षे - मला पाहू दे

अहम् - मी

ये - जे

एते - ते

अत्र - येथे

समागता: - एकत्रित झालेल्या

धार्तराष्ट्रस्य - धृतराष्ट्राच्या पुत्रांचे

दुर्बुद्धे: - वाईट बुद्धीचा

युद्धे - युद्धात

प्रिय - प्रिय

चिकीर्षव: - इच्छिणारे

अर्थ

धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खूष करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे.

तात्पर्य

दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकाविणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत. असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती, पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की, त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे. त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरिता, त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा