भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 13

ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥

शब्दार्थ

तत: - त्यानंतर

शङ्खा:- शंख

च-सुद्धा

भेर्य:-मोठे नगारे, भेरी

च-आणि

पणव-आनक-लहान ढोल आणि तुताऱ्या

गो-मुखा:- रणशिंग

सहसा-अचानकपणे

एव-खचितच

अभ्यहन्यन्त-एकाच वेळी वाजू लागली

स:- तो

शब्द:- (एकत्रित झालेला) आवाज

तुमुल:- भयंकर

अभवत्-झाला


अर्थ

त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा