भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 8


भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।

अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥८॥


शब्दार्थ

भवान् - आपण स्वत:

भीष्म: - पितामह भीष्म

च - आणि

कर्ण: - कर्ण

च - आणि

कृप: - कृपाचार्य

च - तथा

समितिञ्जय: - नेहमी युद्धविजयी

अश्वत्थामा - अश्वत्थामा

विकर्ण: - विकर्ण

च - तथा

सौमदत्ति: - सोमदत्ताचा पुत्र

तथा - सुद्धा

एव - नक्कीच

च - सुद्धा.


अर्थ

येथे आपण स्वत:, भीष्म, कर्ण, कृप, अश्व त्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत.


तात्पर्य

दुर्योधनाने असामान्य अशा योद्धांचा उल्लेख केला आहे. कारण, हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्व त्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहलीकांच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण, पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पेटी जन्मला होता. कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता.


Comments

Popular posts from this blog

Book Review : कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

Book Review - S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★