Posts

वॅसीली मित्रोखीन, ख्रिस्तोफर अँड्रू - द मित्रोखीन अर्काइव २ ★★★★

Image
वॅसिली मित्रोखिन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केजीबीच्या पहिल्या मुख्य संचालनालयाच्या परदेशी हेरगिरी करणाऱ्या विभागामधून केली. जेव्हा मित्रोखिन यांनी निकिता ख्रुश्चेव्हच्या एका गुप्त भाषणावर टीका केली तेव्हा त्यांना ऑपरेशन्समधून अभिलेखागारात (डॉक्युमेंट अर्काइवज विभागात) स्थानांतरित करण्यात आले. १९६० च्या अखेरीस, केजीबीचे लुब्यांका हे मुख्यालय अपुरे पडू लागल्याने मॉस्कोबाहेर यासेनेव्हो येथे एक नवीन इमारत बांधली. या इमारतीला मुख्य संचालनालयाचा दर्जा देण्यात आला आणि तेथून सर्व परदेशी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले. त्या वेळी अभिलेखागार विभागाचे प्रमुख असलेले मित्रोखिन यांना कागदपत्रांची यादी तयार करण्याचे आणि नवीन मुख्यालयात त्यांचे सुव्यवस्थित हस्तांतरण पाहण्याचे काम सोपवण्यात आले. भव्य अभिलेखागाराचे हस्तांतरण पूर्ण व्हायला १९७२ ते १९८४ अशी १२ वर्षे लागली. या गदारोळाचा फायदा घेऊन मित्रोखिन यांनी त्यातली काही कागदपत्रे आणि त्यांतील मजकूर चोरला. १९९० मध्ये सोविएत संघाचे विघटन झाले. त्याचा फायदा घेऊन तो लाटव्हियाला गेला आणि त्याने तेथील ब्रिटिश आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांशी ...

मार्क टुली - इंडिया इन स्लो मोशन ★★★

Image
मार्क टुली यांचा जन्म ब्रिटीश कालीन भारतात झाला. त्याकाळी त्यांना भारतीय समाजापासून कटाक्षाने दूर ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यामुळे ते काहीसे अर्धवट भारतीय आहेत. त्यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोण गोऱ्या ब्रिटिशांप्रमाणे पूर्वग्रहदूषित आहे. ज्याप्रमाणे गोऱ्यांना भारतीय समाजाच्या भावना समजत नाही, तसेच मार्क यांचेही झाले आहे. त्यांच्या लिखाणातून हे जाणवते. काही प्रमाणात त्यांची भारतातील लोकांच्या अध्यात्माविषयी, भ्रस्टाचाराविषयी मत योग्य असले तरी बऱ्याच गोष्टींची जाण आपण पूर्णपणे भारतीय असल्याशिवाय होत नाही हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे या पुस्तकातील काही टीका काही विचार एक भारतीय म्हणून आपल्याला पटत नाहीत. तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्‍या बालकामगारांच्या प्रश्‍नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेल...

निवडक धनंजय - तृतीय नेत्र ★★★★★

Image
मराठी साहित्याच्या प्रांतात 'रहस्यकथांचा बादशहा' हे बिरूद मिरवणारे 'धनंजय' नियतकालिक म्हणजे केवळ एक मासिक नसून, तो अनेक पिढ्यांच्या वाचनानंदाचा एक अविभाज्य भाग आहे. नुकताच या नियतकालिकाने आपला पन्नास वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अनेक पुस्तक विक्रेत्यांच्या वेबसाइटवर 'गेल्या पन्नास वर्षांतील निवडक रहस्य, भय आणि गूढकथांचा महासंग्रह' असा जो उल्लेख आढळतो, तो कोणत्याही दर्जेदार वाचनप्रेमीला हे पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्युक्त करण्यास पुरेसा ठरतो. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या युगात आपण मोबाइलच्या स्क्रीनमध्ये हरवलो आहोत. परंतु, पूर्वीचा काळ वेगळा होता. जेव्हा दृकश्राव्य माध्यमांची कमतरता होती, तेव्हा सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मराठी माणसांमध्ये वाचनाचे प्रचंड वेड होते. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना आज जसे प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतात, तसे त्या काळी प्रवाशांच्या हातात एखादे उत्कंठावर्धक 'पॉकेट नॉवेल' असायचे. या पॉकेट नॉवेल्सच्या आणि रहस्यकथांच्या विश्वात 'धनंजय' हे नाव अग्रक्रमाने...

जेन ऑस्टेन - प्राइड अँड प्रिजूडीस ★★★★

Image
जेन ऑस्टेन यांचे प्राइड अँड प्रिजूडीस हे इंग्रजी साहित्यातील एक कालातीत क्लासिक मानले जाते. १८१३ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत इंग्लंडमधील १९व्या शतकातील मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण अत्यंत सूक्ष्मतेने आणि विनोदी शैलीत केले आहे. ही कथा मुख्यतः एलिझाबेथ बेनेट आणि मिस्टर डार्सी यांच्या नात्याभोवती फिरते, पण त्यातून स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक प्रतिष्ठा, वर्गभेद आणि वैयक्तिक स्वाभिमान यांचे अनेक पैलू उलगडले जातात. एलिझाबेथ बेनेट ही एक बुद्धिमान, स्पष्टवक्ती आणि आत्मनिर्भर तरुणी आहे. तिच्या कुटुंबातील पाच बहिणींमध्ये ती सर्वात वेगळी आहे, विचारांनी परिपक्व आणि सामाजिक रूढींना आव्हान देणारी. मिस्टर डार्सी हा एक श्रीमंत, प्रतिष्ठित पण आरंभी गर्विष्ठ वाटणारा पुरुष आहे. त्यांच्या पहिल्या भेटीतच दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतो, एलिझाबेथला डार्सीचा गर्व खटकतो, तर डार्सीला एलिझाबेथचे स्पष्टवक्तेपण आणि सामाजिक स्तर खटकतो. पण जसजसे कथानक पुढे सरकते, तसतसे त्यांच्या स्वभावातील बदल, आत्मपरीक्षण आणि परस्पर समजूतदारपणा यामुळे त्यांचे नाते विकसित होते. ऑस्टेनने स्त्रियांच्या विवाहाच्या सामाजिक दबावावर...

राम गणेश गडकरी - संपूर्ण बाळकराम ★★

Image
साधारण 80-90 च्या दशकात आम्ही शाळेत असताना मराठी गद्यामध्ये असलेले बाळकराम यांचे नाव अद्यापी माझ्या स्मृतिमध्ये ताजे आहे. त्यांच्या रिकामपणाची कामगिरी या लेखनातून आलेला धडा आम्हाला होता. तो काहीसा लहान मुलांच्या वाचनासाठी सोपा केलेला होता. त्याच आठवणीतून मी त्यांचे संपूर्ण बाळकराम हा कथासंग्रह वाचण्याचे ठरवले. लेखक अल्पायुषी होते, ते फक्त 34 वर्षे जगले. या 34 वर्षे जे काही ज्ञान त्यांनी जगाविषयी कमावले त्याचा निचोड त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवतो. 1910 चा इंग्रजांच्या अंमलाखालील भारत कसा होता, त्यावेळचे बुद्धीजीवी लोक कसे विचार करायचे, त्यांचे शिक्षण कसे होते याचा अनुभव त्यांचे हे लेखन वाचल्यावर आपल्याला मिळते. त्यावेळच्या भाषेत आणि आताच्या भाषेत जमीन अस्मानाचा फरक झाल्यामुळे हे लेखन आधुनिक वाचकांना वाचण्यास जड जाते. त्यामुळे अभ्यासपूर्ण वाचन करणाऱ्या प्रगत वाचकासच याचा रसास्वाद घेता येतो. मीसुद्धा शेवटी शेवटी हे पुस्तक वाचताना कंटाळलो होतो. पण जिद्दीने ते वाचून काढले. राम गणेश गडकरी हे मराठी साहित्यातील एक अत्यंत बहुमुखी व प्रभावशाली लेखक होते. नाटककार, कवी, विनोदी लेखक, निबंधकार, ...

अमिष त्रिपाठी - सुहेलदेव ★★★★

Image
अमिष त्रिपाठी यांचं हे पुस्तक ऐतिहासिक पृष्ठभूमीवर आधारित एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी पुस्तक आहे. हे पुस्तक एका अशा वीराच्या कहाणीवर आधारित आहे, जो इतिहासाच्या पानांमध्ये फारसा झळकला नाही, परंतु ज्याचं कार्य भारताच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं – राजा सुहेलदेव. अमिषने ही कथा एका काल्पनिक शैलीत मांडली असली तरी ती इतिहासाच्या संदर्भांना आधार देत, देशभक्ती, नेतृत्व आणि एकात्मतेचा संदेश देते. ही कथा 11 व्या शतकातील भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशमधील बहराईच प्रदेशात घडते. तेव्हा भारतावर तुर्क आक्रमकांचा दबाव वाढत होता. महमूद गझनी आणि त्याच्या सैन्याच्या विध्वंसक आक्रमणांमुळे भारतीय संस्कृती, मंदिरे, आणि लोकजीवन धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजा सुहेलदेव आपला स्वराज्य, संस्कृती आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी उभा राहतो. राजा सुहेलदेव हा राजा मंगलध्वज यांचा पुत्र असतो. त्याचा भाऊ मल्लदेव गझनीच्या आक्रमणात मारला जातो. हा वैयक्तिक आघात आणि देशाच्या लूटमारीमुळे सुहेलदेव एका लढवय्या योद्ध्यात रूपांतरित होतो. पुढे जाऊन, तो विविध जाती-धर्मांचे वीर आपल्या बाजूला घेतो आणि एक शक्तिशाली सै...

ज्युल्स व्हर्न - जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ ★★★★

Image
जुल्स वर्न हे सायन्स फिक्शन साहित्याच्या सर्वोत्तम लेखकांपैकी एक मानले जातात. त्यांच्या अनेक सुप्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी “Journey to the Center of the Earth” ही एक अफाट कल्पनाशक्तीने भरलेली साहसकथा आहे, जी वाचकाला पृथ्वीच्या केंद्रापर्यंत घेऊन जाते. ही कादंबरी 1864 साली फ्रेंच भाषेत प्रथम प्रकाशित झाली आणि त्यानंतर तिचे जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. आजही ही कादंबरी विज्ञानकथा आणि साहस साहित्याच्या क्षेत्रात एक मानदंड मानली जाते. ही कथा जर्मनीतील एक नामवंत भूवैज्ञानिक प्रा. ओटो लिडेनब्रॉक, त्याचा पुतण्या अ‍ॅक्सेल आणि त्यांच्या मार्गदर्शक हान्स यांची आहे. कथानायक अ‍ॅक्सेलच्या दृष्टिकोनातून कथन करण्यात आलेली ही गोष्ट आहे. प्राध्यापक लिडेनब्रॉक यांना एक जुनं आइसलँडिक हस्तलिखित सापडतं, ज्यात एका प्राचीन वैज्ञानिकाने पृथ्वीच्या केंद्रात जाण्याचा मार्ग गुप्त कोडमध्ये लिहिलेला असतो. त्या कोडचं भाषांतर करून ते तिघं एकसंध मोहिमेसाठी निघतात – आइसलँडमधील स्नेफेल्स जोकुल ज्वालामुखीच्या मुखातून पृथ्वीच्या अंतर्भागात जाण्यासाठी. ही मोहीम केवळ भूगर्भीय अन्वेषण नसून, एक अद्भुत आणि धाडसी प्रवास आह...